Goa : Joshua Desoza
Goa : Joshua Desoza Dainik Gomantak (Goa)
गोवा

Goa: म्हापशातील कचरा प्रकल्पाचे काम पूर्ण

Sandeep Survekamble

कुचेली-म्हापसा (Kuchelim-Mapusa) येथील कचरासाहित्य पुनःर्प्रक्रिया प्रकल्याचे काम पूर्ण झाले असून, (The waste recycling process has been completed.) त्याचे उद्‍घाटन ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येईल व त्यात सुक्या कचऱ्यावर पुनःर्प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी दिली. (Mapusa MLA Joshua Said, the dry waste will be recycled.) म्हापसा शहरातील कचरा गोळा करण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली असून, या पालिकेच्या वीस प्रभागांपैकी दहा प्रभागांतील कचरा गोळा करण्याचे काम ‘आउटसोर्सिंग’ माध्यमातून बाहेरील व्यक्तीला देण्यात येईल, (Garbage collection in ten out of the twenty wards of the municipality will be outsourced to an outsider.) असेही ते म्हणाले.

म्हापसा पालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचे म्हापसा शहराच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान आहे; परंतु, त्यांना सहसा कुणी त्याबाबत श्रेय देत नाही, असे नमूद करून आमदार डिसोझा म्हणाले, कोविड महामारी, वादळी पाऊस इत्यादी प्रसंगी त्यांनी केलेले कार्य न विसरता येण्याजोगे आहे. ते कर्मचारीही शेवटी माणसेच आहेत व त्यांच्या खरोखरच्या समस्या आम्ही समजून घेणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस आवश्यक अद्ययावत उपकरणे उपलब्ध करण्यात येतील. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली असून विशेषत: झाडे कापण्याची अद्ययावत यंत्रे त्या यंत्रणेस उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, असेही आमदार डिसोझा म्हणाले.

म्हापसा शहराला सलग दुसऱ्या वर्षी पाणी तुंबण्याच्या घटना घडलेल्या नाहीत, ही एका दृष्टीने चांगली बाब आहे व या बाबतीत राज्य सरकार व म्हापसा नगरपालिकेने यथोचित कामगिरी पार पाडल्याने ती समस्या यंदाही उद्‍भवलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार ज्योशुआ डिसोझा म्हणाले, सध्या म्हापसा शहरात वीज खंडित होण्याच्या घटना परिस्थितीजन्य कारणांमुळे कायम आहेत. यावर उपाययोजना म्हणून म्हापशातील भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासंदर्भात मी शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत असून, सुमारे एकशे तीस कोटी रुपयांच्या या कामाला वित्तीय मंजुरी मिळाल्यानंतरच काम सुरू करण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT