म्हापशातील (Mhapsha) सामाजिक कार्यकर्ते सलमान खान (Salman Khan) यांनी आज ‘आप’मध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश केला आहे. Dainik Gomantak
गोवा

Goa: म्हापशातील सामाजिक कार्यकर्ते सलमान खान यांचा 'आप'मध्ये प्रवेश

अनेक प्रकल्‍प (Project) प्रलंबित आहेत. बाजारपेठेतील बिकट परिस्थिती, खराब रस्ते आणि पार्किंगची परिस्थिती या मुद्द्यांकडे स्थानिक आमदार आणि भाजप सरकारने (BJP government) दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच सलमान (Salman Khan) आणि त्यांची टीम अनेक समस्यांवर सक्रियपणे काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

म्‍हापसा: म्हापशातील (Mhapsha) सामाजिक कार्यकर्ते सलमान खान (Salman Khan) यांनी आज ‘आप’मध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश केला आहे. खान हे गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे (National Social Party) उत्तर गोवा प्रमुख होते. कचरा व्यवस्थापनावर काम करण्याबरोबरच म्हापसा तार नदी वाचवण्याच्या प्रयत्नासाठी खान हे गोव्यात (Goa) प्रसिद्ध आहे. कोविड टाळेबंदीदरम्यान सलमान खान यांनी गरीब लोकांना आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना फूड पॅक (Food pack) पुरवण्याचे देखील काम केले आहे.

‘आप’चे गोवा राज्य संयोजक राहुल म्हांब्रे आणि पक्षाचे नेते सुनील सिग्नापूरकर यांच्या उपस्थितीत त्‍यांनी पक्षात प्रवेश केला. म्‍हापसा मतदारसंघात स्थानिक आमदार आणि भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या २० वर्षांपासून अपेक्षित विकास झालाच नाही. अनेक प्रकल्‍प प्रलंबित आहेत. बाजारपेठेतील बिकट परिस्थिती, खराब रस्ते आणि पार्किंगची परिस्थिती या मुद्द्यांकडे स्थानिक आमदार आणि भाजप सरकारने दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच सलमान आणि त्यांची टीम अनेक समस्यांवर सक्रियपणे काम करत आहे.

म्हापशातील समस्यांबाबत काम करावयाचे आहे. त्‍यासाठी एक व्यासपीठ मिळवणे आणि म्‍हापसा परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित समस्यांना हाताळण्‍यासाठी ‘आप’मध्‍ये सामील होण्याचा माझा एकमेव हेतू आहे.

- सलमान खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

Mapusa: बार्देश प्रशासकीय संकुलाची दुर्दशा! नाक मुठीत धरून करावी लागते ये-जा; पार्किंगची समस्याही जटील

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT