CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mhaje Ghar: 'भाजप सरकार कोणाचेच घर मोडणार नाही'! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सर्व घरे कायदेशीर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले, मूळ गोमंतकीयांची घरे भाटकार किंवा कोमुनिदादच्या जमिनीत असली तरी शासन ती कायमस्वरूपी करण्याच्या प्रक्रियेत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

शिरोडा: ‘माझे घर’ योजनेअंतर्गत कोणत्याही जागेत असलेले गोमंतकीय बांधवांचे घर कायमस्वरूपी त्यांच्या मालकीचे होणार आहे. भाजप सरकार कोणाचेच घर मोडणार नाही. उलट सर्व घरे कायदेशीर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बाजार-शिरोडा येथे ‘माझे घर’ योजनेविषयी माहिती देताना मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, दीपक नाईक बोरकर, शिरोडा सरपंच पल्लवी शिरोडकर, विविध पंचायतींचे सरपंच आणि अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मूळ गोमंतकीयांची घरे भाटकार किंवा कोमुनिदादच्या जमिनीत असली तरी शासन ती कायमस्वरूपी करण्याच्या प्रक्रियेत आहे. प्रत्येक पंचायत कार्यालयात शासकीय अधिकारी येऊन अर्ज भरून घेतील. जुने घर पुन्हा बांधताना कोणालाही अडवले जाणार नाही. पंचायत क्षेत्रातील घरदुरुस्तीला तीन दिवसांत परवानगी दिली जाईल.

दरम्‍यान, याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शिरोडा कोमुनिदाद व कोडार कोमुनिदादमधील सहकार्य करणारे जमीनदार म्हाडू ऊर्फ राजू प्रभुगावकर आणि अध्यक्ष प्रशांत गावकर यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला बोरी, शिरोडा, पंचवाडी, बेतोडा व निरंकाल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते पाच नागरिकांना अर्जांचे वितरण करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्‍वपूर्ण घोषणा

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४० हजार रुपये मदत.

बागायती, पिकांच्या नुकसानीस तीन महिन्यांत देणार भरपाई.

सरकारकडून विशेष मदत योजनेची अंमलबजावणी लवकरच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT