Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: मंत्री राणेंकडून वन खाते काढून घ्‍या - ‘सेव्‍ह गोवा-सेव्‍ह टायगर’ ची मागणी

राजन घाटे : म्हादईच्या संवर्धनासाठी ‘सेव्‍ह गोवा-सेव्‍ह टायगर’ सर्व पातळ्‍यांवर लढणार

गोमन्तक डिजिटल टीम

'Save Goa-Save Tiger' स्‍वत:च्‍या स्‍वार्थासाठी गोव्‍याच्‍या पंधरा लाख लोकांसह त्‍यांच्‍या भावी पिढ्यांवर अन्‍याय करणारे वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्‍याकडून वन खाते काढून घ्‍यावे.

तसेच वनमंत्र्यांना साथ देणाऱ्या त्‍यांच्या पत्‍नी दिव्‍या राणे यांच्‍याकडून वनविकास महामंडळ काढून घ्‍यावे अशी मागणी ‘सेव्‍ह गोवा-सेव्‍ह टायगर’ संघटनेच्‍या वतीने संयोजक राजन घाटे यांनी केली आहे. आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ज्‍येष्‍ठ पर्यावरण अभ्‍यासक प्रा. राजेंद्र केरकर, प्रतिमा कुतिन्‍हो उपस्‍थित होत्‍या. घाटे म्‍हणाले, म्‍हादईच्‍या संरक्षण आणि समर्थनासाठी म्‍हादई अभयारण्‍य वनक्षेत्र बनणे गरजेचे होते. म्‍हणूनच आम्‍ही वेगवेगळ्‍या पातळ्‍यांवर कर्नाटकाशी लढत होतो.

म्‍हादईचा गळा घोटू पाहणाऱ्या कर्नाटकाला या मार्गाने विरोध करणे अत्‍यंत सोपे असताना राज्‍य सरकारने कोर्टकचेऱ्या खेळत जनतेच्‍या कराचे कोट्यवधी रुपये खर्च केले. त्‍याऐवजी हे क्षेत्र व्‍याघ्रक्षेत्र झाले असते, तर कर्नाटकाला कळसा-भांडुरा प्रकल्‍प पुढे नेताच आला नसता.

आता लोकभावनेबरोबर उच्च न्‍यायालयाने राज्‍य सरकारला दणका देऊन पुढील तीन महिन्‍यांत हे क्षेत्र व्‍याघ्र प्रकल्‍प म्‍हणून घोषित करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

आता मुख्‍यमंत्र्यांनी याची तातडीने अंमलबजावणी करावी. याउलट हा प्रश्‍‍न सर्वोच्च न्‍यायालयात नेला जाईल अशी भाषा करणाऱ्या आणि निसर्गाच्‍या विरोधात काम करणाऱ्या वनमंत्र्यांकडून खाते काढून घ्‍यावे, असेही घाटे म्‍हणाले.

‘त्‍यांनी’ स्‍वत:च्‍या खर्चाने न्‍यायालयात जावे

म्‍हादईच्‍या न्‍यायालयीन लढ्यासाठी राज्‍य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आता यापुढे कोर्टकचेऱ्यांसाठी सामान्‍य माणसांच्‍या कराचे पैसे वापरले जाऊ नयेत. व्‍याघ्र प्रकल्‍पासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची असेल,

तर मंत्री महोदयांनी स्‍वत:च्‍या पैशाने १०० वकिलांची फलटण घेऊन लढावे. आम्‍ही आमचा म्‍हादईच्‍या संरक्षणाचा लढा चालूच ठेवणार आहोत, असे राजन घाटे यांनी सांगितले.

‘बफर झोन’मध्‍ये लोक राहू शकतात : राजेंद्र केरकर

गोव्‍याला वाघ नवा नाही. इथल्‍या जंगलांमध्‍ये तो प्राचीन काळापासून वास्‍तव्‍य करून आहे. बेसुमार शिकारींमुळे वाघांची मोठ्या प्रमाणात हत्‍या करण्‍यात आली. गोव्‍यात वाघांची हत्‍या सुरूच आहे.

म्‍हादई व्‍याघ्र प्रकल्‍पाबाबत अनेक गैरसमज असून केवळ ‘कोअर झोन’मध्‍ये लोकवस्‍ती नको असते. मात्र, ‘बफर झोन’मध्‍ये लोक राहू शकतात, त्‍यांचे दैनंदिन व्‍यवहार करू शकतात. केवळ मोठ्या प्रकल्‍पांना निर्बंध असतात, असे राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT