Water Project  Dainik Gomantak
गोवा

म्हादईतील तरंगते पंपहाऊस पाण्यात

10 कोटींचा झाला होता खर्च: उद्‍घाटन होऊन तीनच दिवस

गोमन्तक डिजिटल टीम

Water Project: गांजे येथील म्हादई नदीवरील पाणी प्रकल्पावरील पंप हाऊस आज (बुधवारी) सकाळी जोरदार पावसावेळी अचानक कोसळला. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनागोंदी पुन्हा उघड झाली आहे. पाळी, वेळगे व सुर्ल या तीन पंचायतींना पाणी पुरवण्यासाठी उभारलेल्या या पाणी प्रकल्पाचे गेल्या रविवारी १६ रोजी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले होते.

या कामाला खाण कंपनींच्या मार्फत उत्तर गोवा खनिज खाण निधीतून पैसा अदा करण्यात आला आहे. सुमारे दहा कोटी रुपये या कामावर खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. चार दिवसांपूर्वी कला अकादमीच्या एका भागाचे छत कोसळल्यानंतर आता पंप हाऊस पाण्यात कोसळल्याने विरोधकांना आयताच विषय मिळाला आहे.

जलस्त्रोत खात्यातर्फे पाण्याची ‘बराज'' तसेच पाणी खेचून ते लोकांना पोचवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने हे पंप हाऊस उभारले होते. कोल्हापूर येथील आर्या कंपनीतर्फे हे काम करण्यात आले होते, मात्र पावसाचा जोर त्यातच म्हादई नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याला धार असल्याने हे पंपहाऊस अचानक पाण्यात कोसळले.

पंप पाण्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनसह यंत्रसामुग्री आणली, मात्र नदीच्या पाण्याला जोरदार झोत असल्याने या कामात अडथळे येत आहेत.

‘काँग्रेस’ पक्षाकडून टीकेची झोड

दोन दिवसांपूर्वी कला अकादमीच्या एका भागाचे छत कोसळल्यानंतर काँग्रेस पक्षाने जोरदार टीका केली होती, आता पाण्याचा पंपहाऊस कोसळल्यामुळे काँग्रेस पक्षाने सरकारी यंत्रणेच्या अनागोंदीवर बोट ठेवले आहे.

सत्ताधारी भाजपकडून कमिशनवर कशी कामे केली जातात, त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. उसगाव - गांजे पंचायतीच्या पंचसदस्य तथा काँग्रेसच्या कार्यकर्त्या मनिषा उसगावकर यांनी पाण्याचा झोत तसेच बांधकामस्थळाचा योग्य अभ्यास न करता बांधकाम करून लोकांचा पैसा वाया घालवलेल्या संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

गांजे येथील म्हादई नदीत तीन पंचायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. हे पंप हाऊस पाण्यावर तरंगणारे असून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली असून मोठे झाडे पाण्यात वाहून येऊन या पंपाला धडकले, त्यामुळे हा पंप पाण्यात कोसळला, सध्या तरी तशी मोठी हानी झालेली नाही, मात्र पाण्यातून पंप बाहेर काढण्यात येत आहे.

- उत्तम पार्सेकर , प्रधान अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makharotsav in Goa: 16व्या शतकातील परंपरा, पोर्तुगीज आक्रमणातून वाचलेल्या मूर्तींचा अनोखा उत्सव; देवीच नाही तर गंडभैरवाचाही भरतो 'मखरोत्सव'

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

Siolim: शिवोलीवासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीप्रश्न कायमचा सुटणार; आसगाव, हणजूण, वागातोर, बादे, शापोरा परिसरालाही फायदा

Goa Opinion: रामाची ‘फाइल’ कुणी व कशासाठी दिली हे जाहीर होईल का? गोव्यात बहरतोय ‘कंत्राटी मारेकऱ्यां’चा व्यवसाय

SCROLL FOR NEXT