X Ray Dainik Gomantak
गोवा

वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती! आता छातीच्या ‘एक्स रे’ वरून देखाल कळणार वय!

नवे संशोधन : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने नवीन मॉडेल विकसित

गोमन्तक डिजिटल टीम

X Ray शरीरातील विविध समस्यांचे निदान करण्यासाठी ‘एक्स रे’चा वापर केला जातो. मात्र, आता संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने छातीच्या एक्स रे वरून संबंधित व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधू शकणारे नवीन मॉडेल विकसित केले आहे.

यासंदर्भातील संशोधन ‘द लॅन्सेट हेल्दी लाँगेविटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. जपानमधील ओसाका मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे मॉडेल विकसित केले.

हे एक्स रे चे नवीन मॉडेल व्यक्तीच्या वयाबरोबरच उच्च रक्तदाब आणि ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ सारख्या फुफ्फुसांच्या आजारांविषयीही सूचित करू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स रेच्या मॉडेलने वैद्यकीय प्रतिमा प्रणालीत झेप घेतली असून आजारांचे लवकर निदान होऊन वेळीच उपचार करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल

संशोधकांनी ३६,०५१ व्यक्तींचे ६७,१०० एक्स रे काढून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल विकसित केले. यावेळी या एक्स रेने वर्तविलेला वयाचा अंदाज व व्यक्तीचे कालानुक्रमानुसार किंवा प्रत्यक्षातील वय यात नजीकचा सहसंबंध असल्याचेही संशोधकांना आढळले.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स रेने वर्तविलेले वय जेवढे अधिक तेवढे संबंधित व्यक्तीला वरील आजार होण्याची शक्यता अधिक, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक्स-रे केवळ शरीरातील अवयव व हाडांची स्थितीच दर्शवीत नाही तर तो वय तसेच दीर्घायुष्याबाबत अंदाज वर्तविण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. हे तंत्रज्ञान अधिक विकसित करून जुनाट आजारांच्या तिव्रतेचा तसेच आयुर्मानाचा अंदाज घेण्यासाठी ते वापरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. - यासुहितो मितसुयामा, संशोधक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT