Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणारा कर्मचारी निलंबित

Goa Medical College: आरोग्यमंत्र्यांचा आदेश: अंतर्गत चौकशी सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Medical College: गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी बहुउद्देशीय कर्मचारी (एमटीएस) सुमेश होबळे याला निलंबित करण्याचा आदेश आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला आहे.

गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली याविषयी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या चौकशीत तो दोषी आढळला, तर त्याला सेवेतून बडतर्फ केले जाईल, असे राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

याआधी फोंडा इस्पितळातील एका डॉक्टरला रुग्णांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने बडतर्फ करण्यात आले आहे, तर दंत वैद्यकीय महाविद्यालयातील दोन परिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्य सेवेत शिस्त आणण्याचा प्रयत्न राणे यांनी चालवला आहे. त्यासाठी ते अचानकपणे इस्पितळांना भेटी देऊन पाहणी करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT