Theft Canva
गोवा

GMC Theft: ‘गोमेकॉ’तील धक्कादायक प्रकार! 'ड्रग्स'साठी रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक; तब्बल दहा मोबाईल जप्त

Goa GMC Theft News: ड्रग्स खरेदी करण्यासाठी पैसे मिळावेत, म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या माविन फर्नांडिस याला अटक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa GMC Mobile Theft Case

तिसवाडी: ड्रग्स खरेदी करण्यासाठी पैसे मिळावेत, म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरी करणाऱ्या माविन फर्नांडिस याला अटक करण्यात आली आहे.

हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून तो समाजमाध्यमावर झळकत आहे. चिंचणी येथील माविन फर्नांडिस याच्याकडून आगशी पोलिसांनी तब्बल दहा मोबाईल जप्त केले. ड्रग्ज व्यसनासाठी ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

राज्यात मोबाईल फोन चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासून बघितल्यानंतर माविन हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोबाईल चोरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आपल्या सहकाऱ्याबरोबर तो चोरी केलेले फोन मजुरांना विक्री करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१५ गुन्हे नोंद!

माविनच्या विरोधात यापूर्वी १५ गुन्हे नोंद असून त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत असून त्याच्याकडून इतरही माहिती उपलब्ध होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT