Goa medical college doctor death case Dainik Gomantak
गोवा

'जेनेटिक डिप्रेशन'मध्‍ये होती ती महिला डॉक्‍टर! आत्‍महत्‍येचा संशय; अहवालाकडे लक्ष

Goa medical college doctor death case: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) इंटर्नशिप करणारी गौरी नारायण (२३, मूळ केरळ) हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) इंटर्नशिप करणारी गौरी नारायण (२३, मूळ केरळ) हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. प्राथमिक तपासात ती काही काळापासून ‘जेनेटिक डिप्रेशन’ (आनुवंशिक नैराश्य) या मानसिक आजाराशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे.

दोनापावला येथील हवाई समुद्र परिसरात या डॉक्‍टर महिलेचा मृतदेह काल बुधवारी आढळला होता. तपासादरम्यान तिच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा व घटनास्थळी अनेस्थेसिया औषधाची बाटली सापडली. याच आधारे प्राथमिक स्वरूपात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तथापि, अधिकृत निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेला नाही.

शवविच्छेदन अहवालात ‘नथिंग सिग्निफिकंट’ असा निष्कर्ष नोंदवण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. मृतदेहातील नमुने जतन करून ते पुढील तपासासाठी टॉक्सिकोलॉजी (विष तपासणी) आणि हिस्टोपॅथॉलॉजी (सूक्ष्म पेशी तपासणी) चाचण्यांसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालांनंतरच मृत्यूचे कारण निश्चित होण्याची शक्यता आहे.

गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी संबंधित औषधे अत्यंत नियंत्रित स्वरूपाची असल्याचे स्पष्ट केले. तर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, केरळहून आलेल्‍या गौरीच्‍या पालकांना या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

तपासातील मुद्दे

‘जेनेटिक डिप्रेशन’चा मानसिक तणाव, हातावर इंजेक्शनच्या खुणा, घटनास्थळी सापडली अनेस्थेसिया औषधाची बाटली, पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचा संशय, महाविद्यालयाकडून करण्यात आले होते समुपदेशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT