mayem lake 
गोवा

Goa Tourism: मये तलावाचे अखेर भाग्य उजळणार

पर्यटन विकास महामंडळाकडून या मये तलावाचा विकास करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: पर्यटन स्थळ म्हणून देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या मये तलावाचे आता भाग्य उजळणार आहे. जवळपास आठ वर्षांच्या कालखंडानंतर उत्तर गोव्यातील ‘पर्यटन स्थळ दर्शन’ सफर अंतर्गत शनिवारी पर्यटक या तलावाला भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. पर्यटन विकास महामंडळातर्फे या पर्यटन सफरीचे आयोजन करण्यात आले आहे.

एक काळ असा होता, की मये तलाव म्हणजे देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरले होते. मात्र, तलावाचा हवा तसा विकास झाला नसल्याने या तलावाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली होती.

सात वर्षांपूर्वी मयेचे तत्कालीन आमदार स्व. अनंत शेट यांच्या प्रयत्नातून तलावाच्या विकसित कामाचा प्रस्ताव मार्गी लागला. पर्यटन विकास महामंडळाकडून या तलावाचा विकास करण्यात आला आहे.

गतवैभव प्राप्त होणार

विकासकामानिमित्त गेल्या सहा-सात वर्षांपासून मये तलाव पर्यटनासाठी बंद होता. आता या तलावात बोटिंग सुविधाही सुरु झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावस्थळी पर्यटकांना आकर्षित करणारी ‘बंजी जंपिंग’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आठ वर्षांनंतर पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारातून पर्यटक येत असल्याने, आता या तलावाला गतवैभव प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत.

आमदारांकडून होणार स्वागत

म्हापसा रेसिडेन्सी येथून सकाळी या पर्यटन सफरीला प्रारंभ होणार असून पर्यटक वाहनाचे दुपारी मये तलावस्थळी आगमन होणार आहे. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट या पर्यटकांचे स्वागत करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT