Goa Farmers | Diwali Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Diwali Festival: मयेत शेतकऱ्यांकडून परंपरेचे 'वण्यार' परिसरात जतन

Goa Diwali Festival: काळ बदलत चाललाय, तसे काळाच्या ओघात काही पारंपरिक रीतीरिवाज पडद्याआड होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Diwali Festival: काळ बदलत चाललाय, तसे काळाच्या ओघात काही पारंपरिक रीतीरिवाज पडद्याआड होत आहेत. दिवाळी काळात बलिप्रतिपदा अर्थातच गोधन (गुरांचा) पाडवा साजरा करण्यात येत असला, तरी काही भागात या सणातील काही परंपरागत चालत आलेल्या प्रथा बंद पडल्या आहेत.

माळरानावरील पारंपरिक जागेत बसून पोळे (भाकरी) आणि चटणीचा आस्वाद घेण्याची गुरांच्या पाडव्यातील पूर्वापार परंपरा मये सारख्या ठिकााणी पाळली जाते. पोळ्यांचा पाडवा बलिप्रतिपदेदिनी साजरा करण्यात येणारा गुरांच्या पाडव्याला पोळ्यांचा पाडवा म्हणूनही ओळखण्यात येते.

एक काळ असा होता, की पाडव्यादिवशी गोठ्यात गुरांची पूजा केल्यानंतर गुराखी अर्थातच शेतकरी घरात भाजलेले पोळे, चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन रानात जायचे. नंतर त्याठिकाणी पारंपरिक जागेत एकत्रित बसून आंबट-तिखट चटणीसह पोळ्यांचा आस्वाद घेत असे. बदलत्या काळानुसार बहुतेक भागात ही परंपरा कालबाह्य होत असतानाच, डिचोली तालुक्यातील मये गावात ही परंपरा आजही टिकून आहे.

वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही काल बुधवारी गुरांच्या पाडव्यातील ही परंपरा जोपासताना मये गावातील केळबायवाडा, कुंभारवाडा आदी भागातील शेतकरी सकाळी पोळे आणि चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन ''वण्यार'' येथील माळरानावर गेले. त्याठिकाणी सर्वांनी एकत्रित बसून पोळे, चिकन आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पाडव्याचा आनंद द्विगुणित केला.

दामोदर गोसावी, ज्येष्ठ नागरिक, मये-

गुरांच्या पाडव्या दिवशी प्रत्येकजण ''गुराखी'' ही भावना बाळगून माळरानी जातात. ही परंपरा आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. आजही आम्ही ही परंपरा चालूच ठेवली आहे. लहान मुलेही मोठ्या उमेदीने सहभागी होत आहेत. त्यामुळे भविष्यातही ही परंपरा चालूच राहणार असल्याचा आशावाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Administration: शिपाई झालेत 'बॉस'! शिपायांच्या मुजोरीवरुन मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला तंबी; राजकीय वशिला आणि कामचुकारपणा चालणार नाही

Harry Kane Wins Ballon DOr: हॅरी केनने जिंकला बॅलन डी'ओर पुरस्कार! 25 वर्षांनंतर इंग्लंडच्या फुटबॉलपटूचा ऐतिहासिक सन्मान, एम्बाप्पे, मेस्सीसारख्या दिग्गजांना टाकले मागे

खरी कुजबुज: चहापेक्षा किटली गरम

Apple iPad Mini Launch! पहिल्यांदाच OLED डिस्प्ले आणि वॉटर रेझिस्टन्सचा सपोर्ट; किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

मडगाव, म्हापसा, मुरगावसह 11 नगरपालिकांच्या प्रभागांची हद्द निश्चित, निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी; सीमांकनानंतर जागांचे आरक्षण होणार स्पष्ट

SCROLL FOR NEXT