Goa Farming Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: वायंगण शेतीची मयेत लगबग! यंदा पोषक वातावरणामुळे 'तरवा' लावणीच्या कामांना वेग

Tarva Plantation Process In Goa: मये येथील ‘हुपळी’ आणि परिसरातील वायंगण शेती लागवडीची कामे जोरात सुरू असून, लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गाळ साचल्याने मये गावातील काही शेतजमिनी पडीक असल्या, तरी अन्य भागातील वायंगण शेती लागवडीची सध्या लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या मये येथील ‘हुपळी’ आणि परिसरातील वायंगण शेती लागवडीची कामे जोरात सुरू असून, लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

बहुतेक शेतकऱ्यांनी तरव्याची लागवड केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी लावणीची कामे हाती घेतली आहेत. सध्याच्या कामाचा जोर पाहता, चालू जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मये येथील बहुतांश शेतकरी खरीप आणि वायंगण पीक घेतात.

तरीदेखील खनिजाचा गाळ साचल्याने पाटो, हळदणवाडी येथील शेती गेल्या काही वर्षांपासून पडीक आहे. मात्र, दरवर्षी शंभरच्या आसपास शेतकरी कुंभारवाडा परिसरातील ‘हुपळी’ आणि अन्य वायंगण शेती करतात. यंदाही हे शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतीत उतरले आहेत.

अवकाळी पावसामुळे यंदा वायंगण शेती लावणीला काहीसा उशीर झाला, असे उमेश कुंकळकर आणि अन्य शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा वायंगण शेतीसाठी अजून तरी पोषक वातावरण आहे, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेती कामासाठी जांबोटीतील कामगार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात ‘कामेरी’ आणि ‘मानाय’ मिळणे दुरापास्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्याबाहेरील कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या मये भागात कर्नाटकातील जांबोटी भागातील ''मानाय’ आणि ‘कामेरी'' आली आहेत.

ही ''मानाय’ आणि ‘कामेरी'' मशागत तसेच लावणीची कामे करताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून वायंगण शेतीच्या हंगामावेळी आम्ही मये गावात येतो, असे मानाय कृष्णा वारीक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT