COVID-19 Dainik Gomantak
गोवा

"...तर गोव्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता"

कोरोना नियमांचे पालन न केल्यास राज्याला कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेचा फटका बसू शकतो, असे देखील डॉ. शेखर साळकर यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी तसेच आजारी लोकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे कोविड व्यवस्थापनावरील राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी सूचित केले आहे. गोव्यात (Goa) कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. (Goa may face fourth wave of COVID-19)

दिल्ली आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सारख्या ठिकाणी सध्या कोविड (COVID-19) प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या राज्यातील अनेक लोक गोव्याला नियमित भेट देतात तसेच गोव्यातून प्रवास करतात. गोवेकरांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास राज्याला कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेचा फटका बसू शकतो, असे देखील डॉ. शेखर साळकर यांनी नमूद केले आहे.

डॉ. साळकर म्हणाले की, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविड व्यवस्थापनावरील तज्ञ समितीची बैठक अद्याप बोलावलेली नाही. मला असेही वाटते की सरकारने महाराष्ट्राप्रमाणे गोव्याला मास्क मुक्त घोषित करू नये, ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात कुचराई! पालिकांना कोर्टाचा दणका; अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे आदेश

Rohit Sharma T20 Comeback: '2027 च्या वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक!' रोहित शर्माच्या विधानाने चर्चेला उधाण, हिटमॅन नेमकं काय म्हणाला? Watch Video

Generations History: सायलेंट जनरेशन, बेबी बूमर्स ते जेन झी आणि अल्फा; बदलत्या पिढ्यांचा रंजक इतिहास अन् तरुण पिढीचा डिजिटल उठाव!

Goa Administration: शिपाई झालेत 'बॉस'! शिपायांच्या मुजोरीवरुन मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला तंबी; राजकीय वशिला आणि कामचुकारपणा चालणार नाही

Harry Kane Wins Ballon DOr: हॅरी केनने जिंकला बॅलन डी'ओर पुरस्कार! 25 वर्षांनंतर इंग्लंडच्या फुटबॉलपटूचा ऐतिहासिक सन्मान, एम्बाप्पे, मेस्सीसारख्या दिग्गजांना टाकले मागे

SCROLL FOR NEXT