Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: विवाह डेकोरेशनसाठी कर्ज घेणे पडले महागात, युवतीला लाखांचा गंडा; मायणा-कुडतरी पोलिस हद्दीतील घटना

Goa Fraud Case: विवाहाच्या डेकोरेशन खर्चासाठी कर्ज घेण्यासाठी एका २६ वर्षीय युवतीने ऑनलाइन प्रक्रियेचा आधार घेतला खरा, मात्र हा प्रयत्न तिला भलताच महागात पडला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: विवाहाच्या डेकोरेशन खर्चासाठी कर्ज घेण्यासाठी एका २६ वर्षीय युवतीने ऑनलाइन प्रक्रियेचा आधार घेतला खरा, मात्र हा प्रयत्न तिला भलताच महागात पडला. कर्ज तर मिळालेच नाहीच, उलट सायबर भामट्याने तिच्या बँक खात्यातील १ लाख ५१ हजार ८२० रुपये उकळले.

फसवणूक झालेल्या या युवतीने नंतर याबाबत सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तेथून ही तक्रार आता मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४) कलमाखाली हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशुतोष नाईक पुढील तपास करीत आहेत.

असा घातला गंडा

मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मलिहा शेख या युवतीला हा गंडा बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा विवाह निश्चित झाला होता. डेकोरेशनसाठी काही रक्कम आवश्यक असल्याने तिने ऑनलाइन कर्जाच्या कॅश बॉस व रुपेली या दोन साईट्स उघडल्या.

यावेळी एका व्यक्तीने तिला या साईट्सवर संपर्क साधून कर्ज देण्याचे आश्वासन दिले व तिचा बँक खात्याचा क्रमांक तसेच अन्य माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्याने १ लाख ४८ हजार ४० रुपये तिच्या बँक खात्यात जमा केल्याचे भासवले.

त्यानंतर त्वरित ती रक्कम परत काढून घेत, तक्रारदाराच्या खात्यातील १ लाख ५१ हजार ८२० रुपये उकळले. आपण फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख हिने पोलिसात तक्रार दाखल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT