Goa Market Complex Dainik Gomantak
गोवा

Goa Market Complex: डिचोलीतील बाजार संकुलाची होणार दुरुस्ती; आमदारांकडून संकुलाची पाहणी

Goa Market Complex Renovation: जी-सुडातर्फे जवळपास एक कोटी रुपये खर्च करून येथील बाजार संकुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: जी-सुडातर्फे जवळपास एक कोटी रुपये खर्च करून येथील बाजार संकुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर हे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. शेट्ये यांनी सोमवारी सायंकाळी बाजार संकुलातील झालेल्या पडझडीची पाहणी केली.

त्यांनी यावेळी येथील व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व्यापारी आणि ग्राहकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता सत्यस्थिती जाणून घ्यावी, असे शेट्ये यांनी सांगितले.

यावेळी पालिका प्रशासक अक्षय पोतेकर, पालिका अभियंता नदीम, मार्केट निरीक्षक गजानन परवार, माजी उपनगराध्यक्ष नारायण बेतकीकर, माजी नगरसेविका दीपा शिरगावकर, अजित बिरजे, निसार बेग यांच्यासह महेश्वर परब, गुरुदास गावडे, संगम पळ आदी उपस्थित होते.

चंद्रकांत शेट्येंची नाराजी

बाजार संकुलाच्या सद्यस्थितीची आमदारांनी पाहणी केली. तांत्रिक कारणांमुळे संकुलाचे पत्रे उडाले असले, तरी पालिका अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाही नडला आहे. संकुलात सध्या पाणी गळत आहे. त्याला अधिकारीच जबाबदार आहेत, असे स्पष्ट करून आमदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

खरी कुजबुज: 'ते' नेते विजयना स्‍वीकारणार?

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.15, 2.28 की 2.57? 8व्या वेतन आयोगात बेसिक पे किती वाढणार, तुमचा पगार आणि एरियर कसा मोजला जाणार? पाहा संपूर्ण गणित

Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

Rule Change: LPG सिलेंडर, FD, ATMपासून वाहनांच्या किमतीपर्यंत; 1 ऑक्टोबरपासून बदलले 6 मोठे नियम! तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT