Goa: Marigold Flowers In Sakhali. Dainik Gomantak
गोवा

Goa: झेंडू लागवडीसाठी साखळी कृषी कार्यालयाची योजना

Goa: शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन : गोव्‍यातील उत्‍पादन वाढवण्‍यासाठी पुढाकार

Dainik Gomantak

साखळी : श्रावण मास सुरू झाला आहे. या महिन्‍यापासून हिंदू धर्मीयांचे महत्त्‍वाचे सण-उत्सव सुरू होतात. या महिन्‍यात तसेच गुढीपाडवा, गणेशोत्सव, दीपावली, दसरा आदी सर्व सणासुदींना झेंडूच्या फुलांचा (Marigold Flowers) जास्त वापर होतो. देवदेवतांना सजवण्यासाठी मंदिरात किंवा घरोघरीही झेंडूंच्या फुलांची जास्त मागणी असते. त्यामुळे सण-उत्‍सवांच्‍या काळात झेंडूंच्या फुलांचा व्यापार वाढलेला असतो. राज्‍यात मागणी जास्‍त व पुरवठा कमी अशी परिस्‍थिती असल्‍याने या काळात झेंडूंच्या फुलांचा दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच दिसून येतो. या पार्श्वभूमीवर साखळी येथील कृषी कार्यालयाने (Agriculture Office Sakhali Goa) साखळी व ग्रामीण भागातील लोकांसाठी झेंडूंच्या फुलांचे उत्‍पादन वाढवण्‍यासाठी खास योजना आखून लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे.

साखळी येथील कृषी कार्यालयाने फुलांच्या विशेषतः झेंडूच्‍या फुलांच्या बागायतीसाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था व कृषी विभागीय कार्यालय साखळीतर्फे यंदा मोठ्या प्रमाणात झेंडूच्‍या फुलांच्या लागवडीचे काम हाती घेतले आहे. यासाठी कोविड महामारीमुळे या व्यवस्थापनातर्फे ऑनलाईन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात आली आहे.

१०० पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांचा सहभाग

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या सण-उत्‍सवांत तसेच इतर धार्मिक कार्यासाठी बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात झेंडूंची फुले आयात केली जातात. पण, यंदा मोठ्या प्रमाणात झेंडूंची फुले गोव्यातच उपलब्ध करून देण्याचा निर्धार साखळी कृषी कार्यालयाने केला आहे; जेणेकरून ग्राहकांना स्वस्त दरात ही फुले उपलब्ध होऊ शकतील. यासाठी साखळी कृषी विभागीय अधिकारी नीलिमा गावस, सहअधिकारी गोविंद परब, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेचे किशोर भावे, सहअभियंता सुरेंद्र बेतकीकर, ब्लॉक तंत्रज्ञान व्यवस्थापक पूनम महाले यांनी यासाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत. यासंबंधी आयोजित केलेल्या ऑनलाईन शिबिरात साखळी व ग्रामीण भागातील १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला व यासंबंधी सर्व माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

साखळी, सुर्ल येथे रोपे उपलब्ध

साखळी कृषी विभागीय कार्यालयाकडून साखळी या ठिकाणी व ग्रामीण भागासाठी सुर्ल या ठिकाणी झेंडूंची रोपे उपलब्ध केले आहेत. साखळी येथे कृषी विभागीय कार्यालय व ग्रामीण भागासाठी सुर्ल येथील ऐरावत नर्सरी या ठिकाणी इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन कृषी अधिकारी नीलिमा गावस व उपअधिकारी सुरेंद्र बेतकीकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT