Valmiki Faleiro 
गोवा

Valmiki Faleiro: साक्षेपी पत्रकार हरपला! वाल्‍मिकी फालेरो यांचे हृदयविकारामुळेे निधन

फालेरो हे सातत्याने ‘गोमन्तक’च्या रविवार पुरवणीसाठी लिखाण करत होते

गोमन्तक डिजिटल टीम

Valmiki Falero passed away due to heart failure साक्षेपी पत्रकार आणि इतिहास संशोधक, अशी ओळख असलेले मडगावचे माजी नगराध्‍यक्ष वाल्‍मिकी फालेरो (६७) यांचे गुरुवारी (दि. ५ ऑक्टो) दुपारी हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍याने आकस्‍मिक निधन झाले. फालेरो यांच्‍या मागे पत्‍नी डेझी या आहेत. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता.८) मडगावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज दुपारी घरातच त्‍यांना हृदयविकाराचा झटका आल्‍याची माहिती त्‍यांच्‍या निकटवर्तियांनी दिली. त्‍यांच्‍या निधनाची वार्ता शहरात काही मिनिटांतच पसरली. त्यांच्या निधनाने साहित्‍य आणि सामाजिक वर्तुळातील अनेकांना धक्‍का बसला.

फालेरो हे सातत्याने ‘गोमन्तक’च्या रविवार पुरवणीसाठी लिखाण करत होते. त्यांनी पुढील काही महिन्यांचे लेख आधीच लिहून आपली अवीट छाप सोडली आहे.

सिद्धार्थ बांदोडकर मृत्‍यू प्रकरण, वेळ्‍ळीतील तिहेरी खून प्रकरण अशा अनेक प्रकरणांवर वाल्मिकी फालेरो यांनी तडफेने आणि आक्रमकतेने उजेड टाकला होता. फालेरो हे त्‍यावेळी समाजकारणातही सक्रिय होते. कोंकणी राजभाषा आंदोलनात त्‍यांनी आघाडीवर राहून काम केले. मडगावचे नगरसेवक म्‍हणूनही त्‍यांनी कित्‍येक प्रश्नांना वाचा फोडली. त्‍यांच्‍यातील हा लढावूपणा शेवटपर्यंत टिकून होता.

‘केबीसी’वरही चमकले फालेरो

अभ्यासू आणि धडाडी वृत्तीचे पत्रकार, लेखक तथा इतिहास संशोधक, अशी ओळख असलेले वाल्मिकी फालेरो यांनी गुरुवारी दुपारी जगाचा निरोप घेतला. फालेरो यांची कीर्ती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली होती.

‘सोनी चॅनल’वर सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात गेल्या आठवड्यात फालेरो यांनी लिहिलेल्या एका पुस्तकासंदर्भात ‘केबीसी’च्या स्पर्धकाला एक प्रश्‍न विचारला होता.

फालेरो यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ दाखवून त्याचे लेखक कोणत्या राज्याशी संंबंधित आहेत, असा तो प्रश्‍न होता. गोवा, आसाम, हैदराबाद, तामिळनाडू, असे त्याचे पर्याय होते. अखेर उशिरा का होईना, या प्रश्‍नाचे अचूक उत्तर स्पर्धकाने दिले आणि त्याला त्याचे बक्षीसही मिळाले. यावरून फालेरो यांच्या साहित्याची सर्व स्तरांवर दखल घेतली जाते, हे लक्षात आले.

- धनंजय पाटील, पणजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT