President of Goa Forward Vijay Sardesai | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: सरकारने तळ्याची दुरुस्ती करावी

Vijay Sardesai: गंगा आरतीच्या धर्तीवर फातोर्ड्यात दीपोत्सव

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: फातोर्डा येथील दामबाब लिंग मंदिरा जवळ फातोर्डा रहिवाशांनी काल सोमवारी वर्षपद्धतीप्रमाणे दीपोत्सव साजरा केला. यावेळी आमदार विजय सरदेसाई यांनी दामबाब तळ्याचे सुशोभीकरण होऊन ती लोकांना अर्पित झाली तर या ठिकाणी गंगा आरतीच्या धर्तीवर दीपोत्सव साजरा केला जाईल, असे आश्वासन दिले.

या तळ्याशी लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्याची कदर करून गोवा सरकारने या तळीची दुरुस्ती आणि सुधारणा घडवून आणावी, असे सरदेसाई म्हणाले. या उत्सवात लोकांबरोबर विजय सरदेसाई आणि फातोर्डा फॉरवर्ड नगरसेवकांनी भाग घेतला होता.

सरदेसाई यांनी 2017 साली येथील दामबाबांच्या तळ्यातील गाळ उपसला होता. या तळीचे सुशोभितीकरण करून ती लोकांसाठी खुली करण्याची त्यावेळी योजना आखली होती. पण जमीन मालकाने त्याला परवानगी न दिल्याने हे काम होऊ शकले नाही.मंदार सावर्डेकर म्हणाले, 10 वर्षापूर्वी सरदेसाई यांच्या पुढाकारातून हा दीपोत्सव सुरू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT