Margao News Dainik Gomantak
गोवा

Margao News: साकवावरून ‘त्‍यांचा’ जीवघेणा प्रवास! गाव पर्यटन नकाशावर येऊन देखील पक्‍का पूल नाही

उसगाळीमळ-कोळंब येथील प्रकार ः विद्यार्थ्यांसह पर्यटकांचीही मोठी कसरत

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News पुराणकालीन प्रस्‍तर शिल्‍पांमुळे उसगाळीमळ-कोळंब (रिवण) हा गाव पर्यटन नकाशावर आलेला असला तरी या शिल्‍पांपासून अवघ्‍या एक कि.मी.वर असलेल्‍या गावात जाण्‍यासाठी अजूनही पक्‍का पूल बांधलेला नाही.

त्‍यामुळे पावसाळ्यात लोकांना नदीवर पोफळीची झाडे टाकून केलेल्‍या साकवावरून जावे लागत असून शालेय विद्यार्थ्यांना तर आपला जीव धोक्‍यात घालून ही नदी पार करावी लागत आहे.

उसगाळी प्रस्‍तर शिल्‍पाजवळच हा वाडा असून या वाड्यावर जाण्‍यासाठी नदी पार करून जावे लागते. उन्‍हाळ्‍यात ही नदी आटत असल्‍याने त्‍यातूनच वाहने घेऊन लोकांना या वाड्यावर जाता येते. मात्र पावसळ्यात ही नदी दुथडी वाहू लागते, त्‍यामुळे हा पोफळीच्‍या झाडाचा पूल हा एकमेव मार्ग त्‍यांच्‍यासाठी खुला असतो.

पण पावसात त्‍यावरून जाणे धोक्‍याचे असल्‍याचे गावकरी सांगतात. या वाड्यावर सुमारे दहा घरे असून सुमारे २० ते ३० लोकांची तिथे वस्‍ती आहे. या सर्वांचा जीव या पुलामुळे पावसात टांगणीला लागलेला असतो.

या गावातील शिवानंद नाईक यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, रोज सकाळी शालेय विद्यार्थी या कमकुवत साकवावरून नदी पार करतात. जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागतो.

कामगाराचा झाला होता मृत्यू

काही वर्षापूर्वी या फोफळीच्‍या पुलावरुन नदी पार करताना एक कामगार नदीत पडून ठार झाला होता. सुदैवाने ही एक दुर्घटना सोडल्‍यास आणखी दुर्घटना जरी घडल्‍या नाहीत तरी सरकारने ही दुर्घटना होण्‍याची वाट पाहू नये. त्‍यापूर्वी त्‍यावर तोडगा काढावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

‘ती’ जागा संपादित करा

या नदीवर पक्‍का पूल बांधण्‍यासाठी एका खासगी बागायतीतून रस्‍ता तयार करावा लागतो. त्‍यासाठी बागायतीचा मालक परवानगी देत नाही, यामुळेच हा पूल होत नाही, असे सांगितले जाते. यावर उपाय म्‍हणजे, सरकारने ही जागा संपादित करावी आणि या समस्‍येवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT