Goa News | Sal River  Dainik Gomantak
गोवा

Sal River: मंत्री काब्रालविरोधात पोलिसांत तक्रार

Sal River: साळ नदी प्रदूषण : दुर्लक्ष केल्याचा व्हिएगस यांचा आरोप

दैनिक गोमन्तक

Sal River: साळ नदीच्या प्रदूषणावरून यापूर्वी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा मागणारे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी आज काब्राल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांनी जाणून बुजून साळ नदीतील प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

जलस्रोतांचे प्रदूषण जाणून बुजून करणाऱ्यांवर भादंसंच्या 277 कलमानुसार फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे. साळ नदीत सहा ठिकाणांहून सांडपाणी मिसळत आहे. याची एक वर्षापूर्वी संबंधितांना जाणीव करून दिली होती. असे असूनही हे प्रदूषण थांबविण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे या नदीतील मासे मेले, तर दूषित मासे खाऊन लोक आजारी पडले. त्याला सर्वस्वी या दोनच व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप वेंझी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

सहा ठिकाणांहून मिसळते सांडपाणी

शमिला मोंतेरो या गेली चार महिने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहातात. मच्छीमारी खात्याचे संचालकपदही त्यांच्याकडेच आहे. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात केलेल्या पाहणीत सदोष सांडपाणी वाहिनीमुळे सहा ठिकाणांहून सांडपाणी साळ नदीत जात असल्याचे उघड झाले होते. मात्र, हे पाणी थांबविण्यासाठी या दोघांनी काहीच उपाययोजना केली नाही, असा आरोप वेंझी त्यांनी केला.

जलस्रोत मंत्र्यांना साकडे

पर्यावरणमंत्री काब्राल हे निष्क्रिय आहेतच, त्याशिवाय त्यांची वृत्ती उर्मट असून काही दिवसांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करताना सर्वांनी त्यांच्या वृत्तीचा अनुभव घेतला आहे. जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या साळ नदीच्या प्रदूषण विषयात त्वरित लक्ष घालावे. त्यावर तोडगा काढण्यासाठी फक्त मडगाव आणि फातोर्डा येथील आमदारांशी चर्चा न करता नावेली, वेळ्ळी येथील आमदारांसह मलाही बोलवावे, अशी मागणी वेंझी यांनी केली आहे.

"मुख्यमंत्री सावंत यांना याविषयी पत्र लिहिले असून मंत्री काब्राल यांच्याकडून पर्यावरण खाते काढून घ्यावे तसेच शमिला मोंतेरो यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव पदावरून निलंबित करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे."

- वेंझी व्हिएगस, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT