Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa News: मडगावात आज श्रीकृष्ण पूजनोत्‍सव!

Goa News: कृष्णपूजेचा मान मडगावचे आमदार दिगंबर कामत अन् कुटुंबीयांना मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: मडगाव येथील नवयुवक हौशी मंडळातर्फे आज श्रीकृष्ण पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे हे 51वे वर्ष असून उद्या संध्याकाळी 5 वाजता श्री हरी मंदिरात श्रीकृष्ण पूजा होणार आहे.

यंदा कृष्णपूजेचा मान मडगावचे आमदार दिगंबर कामत व कुटुंबीयांना प्राप्त झालेला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुबोध गोवेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. श्रीकृष्ण पालखी उत्सवाला सन्माननीय अतिथी म्हणून नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व माजी आमदार दामोदर नाईक उपस्थित असतील.

सदर कार्यक्रमानंतर श्रीकृष्ण पालखी श्री हरी मंदिरातून लिली गार्मेंट, कोहिनूर ऑप्टिशियन, नगरपालिका चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, लोहिया मैदानमार्गे परत मंदिरात येणार आहे. त्यानंतर नरकासुर प्रतिमेचे दहन करण्यात येईल.

तसेच, या पत्रकार परिषदेला यावेळी योगीराज कामत, सूजय लोटलीकर, महेंद्र नाईक यांचीही उपस्‍थिती होती. नवयुवक हौशी मंडळाच्या स्मरणिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

यापूर्वी या मान्‍यवरांना मिळाला आहे मान

दिवाळीच्‍या आदल्‍या दिवशी केवळ नरकासुराचा उदोउदो होत असल्याचे पाहून 1972 साली तेव्हाचे काही युवक एकत्र आले व त्यांनी श्रीकृष्ण पालखी उत्सव व पूजन कार्यक्रम सुरू केला. गेली सलग 50 वर्षे हा कार्यक्रम अखंडपणे साजरा केला जात आहे.

श्रीकृष्ण पूजेचा पहिला मान गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत यांच्‍यासह अनेक मान्यवरांना मान मिळाल्‍याचे गोवेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT