Goa University Kho Kho Competition  Dainik Gomantak
गोवा

Goa University: सीईएस, केपे महाविद्यालयाला खो खो विजेतेपद

Goa University: संकेत वेळीप, अंकिता वेळीप सर्वोत्तम खेळाडू

किशोर पेटकर

Goa University: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धेत कुंकळ्ळीच्या सीईएस महाविद्यालयाने पुरुष तर केपे सरकारी महाविद्यालयाने महिला गटात विजेतेपद मिळविले. स्पर्धा ताळगाव पठारावरील गोवा विद्यापीठ मैदानावर झाली.

सीईएस महाविद्यालयाचा संकेत वेळीप पुरुष विभागात, तर केपे महाविद्यालयाची अंकिता वेळीप महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली.

पुरुष गटातील अंतिम लढतीत सीईएस महाविद्यालयाने केपे सरकारी महाविद्यालयाला ४८-३४ फरकाने नमविले. महिला गटात केपे महाविद्यालयाने विजेतेपद पटकावताना काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन आणि श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयास ३४-१८ फरकाने हरविले.

स्पर्धेत पुरुषांच १२, तर महिलांत ११ महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. बक्षीस वितरण गोवा क्रीडा प्राधिकरणाचे खो खो प्रशिक्षक कायतान क्लेमेंत, राजन मॅथ्यू, भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत झाले.

विजयी संघ

महिला: केपे सरकारी महाविद्यालय: छाया पाटील, अंकिता गावकर, अंकिता वेळीप, शेजल वेळीप, कृती गावकर, श्वेता गावकर, प्रतीक्षा वेळीप, नागेश्वरी शिंदेकर, सिया नाईक, शिवानी वाडेकर, प्रतीक्षा गावकर, ग्लिफा पिशोट.

महिला: सीईएस महाविद्यालय: अनीश गावकर, राहुल गावकर, संकेत वेळीप, विकी वेळीप, तेजस यमकर, कंदेश वेळीप, प्रणय गावकर, निखिल वेळीप, साहील वेळीप, रुपेश यमकर, रोहन गावकर, अक्षय वेळीप, प्रणय वेळीप, कविश कुरईकर, नरेंद्र गावकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT