CK Nayudu Trophy Dainik Gomantak
गोवा

C. K. Nayudu Trophy: आंध्रचा सहाशे धावांचा डोंगर

C. K. Nayudu Trophy: गोव्याविरुद्ध रेवंतचे द्विशतक, इतर तिघांची शतके

किशोर पेटकर

C. K Nayudu Trophy: द्विशतकवीर के. रेवंत रेड्डी याच्यासह आंध्रच्या एकूण चौघा फलंदाजांनी शतके नोंदविली. त्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक 23 वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर त्यांनी गोव्याविरुद्ध पहिल्या डावात 4 गडी गमावून 606 धावांचा डोंगर उभारला.

कडापा येथील वायएस राजा रेड्डी आंध्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना सुरू आहे. अंधूक प्रकाश व पाऊस यामुळे सोमवारी चहापानानंतरचा खेळ होऊ शकला नाही.

आंध्रने सामन्याच्या पहिल्या दिवशी रविवारी २ बाद ४०४ धावा केल्या होत्या. १६४ धावांवरून रेवंत रेड्डी याने सोमवारी शानदार द्विशतक नोंदविले. त्याने आक्रमक शैलीच्या एम. हेमंत रेड्डी याच्यासमेवत तिसऱ्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली.

शुभम तारीच्या गोलंदाजीवर कौशल हट्टंगडी याच्या हाती झेल दिलेल्या हेमंतने शतक नोंदविले. त्याने १२३ चेंडूंत १३ चौकार व चार षटकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या. रेवंत २२० धावांवर बाद झाला.

राहुल मेहताच्या गोलंदाजीवर शिवेंद्र भुजबळने यष्टिचीत केलेल्या रेवंतने ३७३ चेंडूंत २५ चौकारांच्या साह्याने चमकदार खेळी केली. त्याने एम. के. दत्ता याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली.

झंझावाती फलंदाजी केलेला दत्ता दिवसअखेर १०२ धावांवर नाबाद राहिला. त्याने ८६ चेंडूंतील खेळीत ७ चौकार व तेवढेच षटकार मारले. काल वामशी कृष्ण(१३९) यानेही शतक केले होते.

संक्षिप्त धावफलक

आंध्र, पहिला डाव (२ बाद ४०४ वरून) १२४ षटकांत ४ बाद ६०६ (के. रेवंत रेड्डी २२०, वामशी कृष्ण १३९, एम. हेमंत रेड्डी १२१, एम. के. दत्ता नाबाद १०२, शुभम तारी २२-१-८६-१, लखमेश पावणे २०-३-७३-०, मनीष काकोडे २६-२-१५२-२, दीप कसवणकर १७-२-९१-०, अभिनव तेजराणा ८-०-३२-०, योगेश कवठणकर १६-०-९०-०, राहुल मेहता १४-०-७२-१, आयुष वेर्लेकर १-०-१-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT