Sanjivani Sugar Factory Protest Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory Protest: 'सरकार दखल घेत नसेल तर...',आंदोलक भूमिकेवर ठाम; राजधानीत आंदोलकांचा ठिय्या

Sanjivani Sugar Factory Protest: पणजीत सुरु असलेल्या ऊस उत्पादकांचे आंदोलन अजूनही सुरूच

Ganeshprasad Gogate

Sanjivani Sugar Factory Protest: सकाळपासून राजधानी पणजीत सुरु असलेल्या ऊस उत्पादकांचे आंदोलन अजूनही सुरूच असून, 'जो पर्यंत मुख्यमंत्री आम्हाला भेटून योग्य तो निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे' त्यांनी पत्रकारांना निक्षून सांगितले आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी ऊस उत्पादकांपैकी 5 जणांनी चर्चेसाठी यावे असे सांगितल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

परंतु असं असलं तरी 'कितीही वेळ लागला तरी चालेल पण जो पर्यंत मुख्यमंत्री स्वतः आमच्याशी येऊन याविषयावर बोलत नाहीत तो पर्यंत आम्ही जागेवरून हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय.

सरकार 'संजीवनी' का चालू करत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. शेतकरी हा बेकार नाही, तरीही आपल्या हक्कासाठी शेतकरी बांधव एकवटले असून आंदोलनासाठी इतके दिवस ते झगडत आहेत.

सध्या आंदोलनात 350 शेतकरी सहभागी झाले असून बाकीचे शेतीच्या कामात व्यस्त आहेत. राजधानी पणजीत येऊन देखील सरकार दखल घेत नसेल तर आम्ही शेतीत उतरावे की नाही हा प्रश्न आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया ऊस उत्पादकांनी दिलीय.

संजीवनी कारखान्याच्या भवितव्याबाबत तसेच या ठिकाणी उद्योग की इथेनॉल प्रकल्प उभा राहील, याचे मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ऊस उत्पादक संघटनेने देत आंदोलक अद्यापही घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT