Sanjivani Sugar Factory Protest Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory Protest: राजधानीत ऊस उत्‍पादकांचा एल्गार; CM च्या बंगल्‍याकडे जाणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

Sanjivani Sugar Factory Protest: मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच - ऊस उत्‍पादक

Ganeshprasad Gogate

Sanjivani Sugar Factory Protest: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना व इथेनॉल प्रकल्‍पासंदर्भात सरकारकडून अद्याप ठोस निर्णय तसेच स्पष्टीकरण मिळाले नसल्याने निराश झालेल्या ऊस उत्पादकांनी आक्रमक होऊन आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले.

आपल्‍या मागण्‍या घेऊन मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍याकडे जाण्‍याच्‍या पवित्र्यात असलेल्‍या शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी वाटेत अडवला व काही जणांना ताब्‍यात घेतले. सरकारचे प्रतिनिधी शेतकरी आंदोलकांची भेट घेणार असल्‍याचे आश्‍‍वासन मिळताच शेतकरी पुन्‍हा आझाद मैदानावर परतले.

संजीवनी कारखान्याच्या भवितव्याबाबत तसेच या ठिकाणी उद्योग की इथेनॉल प्रकल्प उभा राहील, याचे मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ऊस उत्पादक संघटनेने दिला आहे.

शेतकऱ्यांचे म्‍हणणे काय?

1. गेल्या चार वर्षांपासून सरकारने आम्‍हाला झुलवत ठेवले आहे. पाच वर्षे ऊस उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याचे दिलेले आश्‍वासन पाळले असले तरी ऊस उत्पादकांच्या भवितव्याबाबत सरकार अजून कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याने संशय निर्माण झाला आहे.

2. सुमारे 700 ऊस शेतकऱ्यांचे भवितव्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू होणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी पणजीतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी केली.

प्रस्ताव सरकारकडे पडून

हा कारखाना चालवणे सरकारला शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते, तेव्हा संघटनेने एका खासगी संस्थेशी बोलणी केली होती. या संस्थेने हा कारखाना सुरू करण्यास पुढाकार घेतला होता. त्यासाठी ती सरकारला 1.25 कोटी रुपये देण्यासही तयार होती. हा प्रस्ताव सरकारकडे मांडण्यात आला. मात्र, तो पडून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT