Ranji Trophy Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Ranji Trophy Cricket Tournament: शतकवीर श्रीदमने त्रिपुराला सावरले

किशोर पेटकर

Ranji Trophy Cricket Tournament: श्रीदम पॉल या एकवीस वर्षीय फलंदाजाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील वैयक्तिक पहिले शतक झळकावताना त्रिपुराला गोव्याविरुद्ध पहिल्या दिवशी सावरले.

सुदीप चटर्जी व गणेश सतीश यांनीही दमदार फलंदाजी केल्यामुळे शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर यजमान संघाने 4 विकेट गमावून 261 धावा केल्या.

आगरतळा येथे चार दिवसीय रणजी करंडक एलिट क गट सामन्यास शुक्रवारी सकाळी खराब हवामानामुळे उशिरा सुरवात झाली. गोव्याने नाणेफेक जिंकून त्रिपुराला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.

वेगवान गोलंदाज लक्षय गर्ग याने 21 धावांत दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडले, मात्र नंतर आठवाच प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या श्रीदम याने दोन महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला अडीचशे धावसंख्या गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

चहापानानंतर त्याने कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. आक्रमक फलंदाजीच्या नादात मोहित रेडकर याला षटकार खेचल्यानंतर पुढच्या चेंडूवर तो विजेश प्रभुदेसाईच्या हाती झेल देऊन बाद झाला. श्रीदम याने 162 चेंडूंतील खेळीत 15 चौकार व 1 षटकार यासह 112 धावा केल्या.

पडझडीनंतर त्रिपुराचे चोख प्रत्युत्तर

लक्षय गर्गच्या तडाख्यानंतर त्रिपुराने गोव्याला चोख प्रत्युत्तर दिले. उपाहाराला त्यांची २ बाद ५५ अशी स्थिती होती, नंतर चहापानाला खेळ थांबला तेव्हा त्यांनी ३ बाद १६५ अशी मजल मारली होती.

श्रीदम याने सुदीप चटर्जी (४२) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. विजेश प्रभुदेसाईने सुदीपला पायचीत बाद करून जोडी फोडली. नंतर कर्नाटक-विदर्भकडून खेळताना सफल ठरलेल्या गणेश सतीश याने त्रिपुरातर्फे पहिल्याच रणजी डावात अर्धशतक नोंदविले.

त्याने श्रीदम याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दिवसअखेर सतीश ५९ धावांवर, तर कर्णधार वृद्धिमान साहा १९ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव: ७४ षटकांत ४ बाद २६१ (बिक्रमकुमार दास १०, बिशाल घोष ७, श्रीदम पॉल ११२, सुदीप चटर्जी ४२, गणेश सतीश नाबाद ५९, वृद्धिमान साहा नाबाद १९, लक्षय गर्ग १६-२-३८-२, अर्जुन तेंडुलकर १५-०-४८-०, दीपराज गावकर ९-१-३०-०, विजेश प्रभुदेसाई १८-२-६५-१, दर्शन मिसाळ ४-०-२८-०, सुयश प्रभुदेसाई ३-०-१२-०, मोहित रेडकर ९-१-३३-१).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT