Fort In Goa Dainik Gomantk
गोवा

Fort In Goa: फितुरीपायी पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केला गोव्यातील 'हा' महत्वाचा किल्ला

Fort In Goa: जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी काही किल्ले बांधले, तर पुढे यांतील निम्मे किल्ले पाडून टाकले.

Ganeshprasad Gogate

Fort In Goa: गोवा प्रदेशावर मौर्य, सातवाहन, कदंब, यादव, दिल्लीचे सुलतान, विजयनगर, बहमनी, आदिलशाही आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी राज्य केले.

परंतु त्यातही 1510 पासून गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली व गोवा स्वतंत्र होईपर्यंत पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे बनले. तत्कालीन राजवटीच्या फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी साष्टी, बारदेश आणि तिसवाडीचा प्रदेश बळकावला.

जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी काही किल्ले बांधले, तर पुढे यांतील निम्मे किल्ले पोर्तुगीजांनी पाडून टाकले. मात्र उरलेल्या किल्ल्यांवर संरक्षणासाठी सैन्य व तोफा ठेवल्याची नोंद सापडते.

मात्र शिवकालीन इतिहास बघता शिवाजी महाराजांच्या काळातील कर्तृत्वाचा ठसा जसा फोंड्याच्या इतिहासावर उमटला तसाच; किंबहुना त्याच्याहून जास्त तो दुर्भाटवर उमटला.

पण यात मराठ्यांच्या ताकदीपुढं कर्तृत्व मात्र शिवपुत्र संभाजीचं होतं. मात्र पराक्रम, मराठ्यांचा निडरपणा यात फरक नव्हता. त्यामुळं गोव्यातल्या दुर्भाटला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

मराठा सैन्याशी दोन हात करतेवेळी पोर्तुगीजांच्या व्हॉइसरॉयनं जेव्हा माघार घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मराठ्यांनी त्यांचा पार धुव्वा उडवला. मग पोर्तुगीजांनी तोफा-बंदुका मागं टाकून पळ काढला. त्यांना दुर्भाटमधली एक टेकडी फक्त पार करायची होती.

पण तिथं मराठे तळ ठोकून बसले होते. शेवटी पोर्तुगीजांनी मराठ्यांवर हल्ला केला. मराठे पळू लागले. हे पाहिल्यावर पोर्तुगीज अधिकच चवताळले आणि अजून जोरानं पाठलाग करू लागले. या पळापळीत जेव्हा पोर्तुगाल सैन्य विखुरलं गेलं आणि कठीण जागी पोचलं, त्या वेळी मराठ्यांनी उलटा हल्ला केला आणि पोर्तुगीजांचा या लढाईत अत्यंत दारुण पराभव झाला.

पुढं पोर्तुगीज व मराठे यांच्यांत अनेक धुमश्चक्री होतच राहिल्या. पोर्तुगीजांना खरंतर खुपत होता संभाजी महाराजांनी बांधलेला 'मर्दनगड', या मर्दनगडावरून कारवार ते कुडाळपर्यंत लक्ष ठेवणं शक्य होत असे. त्यामुळं पोर्तुगीजांना मांडवी-जुआरीच्या रेषेपलीकडे राज्य करता आलं नाही.

पुढे मराठ्यांनी आदिलशहाच्या मांडलिक सौदेकरांकडून मोठ्या कौशल्यानं हा किल्ला मिळवला, तेव्हा रागानं व्हॉइसरायनं परत हल्ला केला. त्याच्याकडं अत्याधुनिक साहित्यसामग्री होती.

पण या वेळी निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं त्यांची चाल फसली व मराठ्यांनी परत धुव्वा उडवला. पण पुढं फितुरीपायी हा किल्ला अखेरीस पोर्तुगीजांकडं गेलाच. त्या वेळी पोर्तुगीजांनी हा किल्ला जमीनदोस्त करून आपला धोका कायमचा मिटवला.

सध्या या पडलेल्या किल्ल्यांचे अवशेषच पाहायला मिळतात. पूर्वी शापोरा किल्ल्याचा वापर जकातगृह म्हणून केला जात असे, तर आग्वाद किल्ल्यावरून पोर्तुगीज गलबतांना पाणी पुरवले जात असे.

त्यांपैकी तेरेखोल, आलोर्ना, आग्वाद, राईश मागोस, सेंट इश्तेव्हाव या काही किल्ल्यांचे राष्ट्रीय व राज्य पुरातत्त्व विभागातर्फे जतन व संवर्धन करण्यात आलेले आहे.

(सदर माहिती ही गोव्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून, वेगवेगळे संदर्भ घेऊन संकलित केली असून यातून गोव्याचे सकारात्मक आणि आदर्श चित्र उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT