Goa Comunidade Dainik Gomantak
गोवा

Goa Comunidade: 'महिलांचा कोमुनिदादमधील सहभाग' प्रश्‍‍न गाजला; तर बेकायदा घरांबाबत अधिवेशनात 'हा' ठराव मंजूर

Goa Comunidade: अतिक्रमण केलेली बांधकामे अधिकृत करू नये’, असा सूर कोमुनिदाद अधिवेशनात व्‍यक्‍त झाला.

Ganeshprasad Gogate

Goa Comunidade: ‘गोव्‍यातील कोमुनिदादींचे वेगळेपण व स्‍वातंत्र्य राज्‍य सरकारने अबाधित राखावे. त्‍यात नाहक हस्‍तक्षेप करू नये. संहितेत कोणतीही सुधारणा करण्‍यापूर्वी कोमुनिदादींच्‍या सदस्‍यांशी सल्‍लामसलत करावी.

अतिक्रमण केलेली बांधकामे अधिकृत करू नये’, असा सूर कोमुनिदाद अधिवेशनात व्‍यक्‍त झाला. तसा ठरावही मंजूर करण्‍यात आला. यावेळी महिलांना कोमुनिदाद प्रशासकीय रचनेत समान हक्‍क द्यावा, अशी काहीजणांनी मागणी केली.

या मुद्यावरून काही जणांनी आक्षेप नोंदवला. ‘तुमची जागा स्‍वयंपाक घरात आणि तुमचे काम मुले बाळे सांभाळणे आहे. संहितेत महिलांचा सहभाग नव्‍हता. आताच का’, असा प्रश्‍‍न एका सदस्‍याने उपस्‍थित केला. त्‍यावरून वातावरण तंग झाले होते.

कोमुनिदाद संहितेत काही बदल होत आहेत. त्‍या पार्श्वभूमीवर दोनापावला येथील ‘एनआयओ’च्‍या सभागृहात आज एकदिवसीय अधिवेशन पार पडले. यावेळी राज्‍यभरातून मोठ्या संख्‍येने कोमुनिदादींचे सदस्‍य दाखल झाले होते.

सध्‍या राज्‍यात 223 कोमुनिदाद कार्यरत आहेत. 12 मुद्यांवर सूचना व हरकती मांडण्‍यात आल्‍या. सरकारच्‍या वतीने महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात उपस्‍थित होते.

उपस्‍थित सदस्‍यांनी आपले मुद्दे पोटतिडकीने मांडले. जुन्‍या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्याची मागणी करण्‍यात आली.

कृषी जमिनींत शेतीला प्रोत्‍साहन:-

कोमुनिदादच्या बहुतांश भूभागांवर बेकायदा अतिक्रमणे असल्याचेही काहींनी निदर्शनास आणून दिले. अतिक्रमित बेकायदा घरांची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी कोमुनिदादच्या मुखत्याराला अतिरिक्त अधिकार देण्याचा ठराव मंजूर करण्‍यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT