Anjuna Night Clubs Dainik Gomantak
गोवा

Calangute Night Club: कळंगुट किनारी भागातील नाईट क्लबवर विक्रीकर विभागाची छापेमारी; GST रेकॉर्ड तपासणी सुरु

Calangute Night Club: आज शनिवारी रात्रौ 9 वाजण्याच्या सुमारास ही मोठी कारवाई करण्यात आलीय.

Ganeshprasad Gogate

Calangute Night Club: किनारी भागातील वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असून काही दिवसांपूर्वी कलेक्टर, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांनी कळंगुट- बार्देश येथे बेकायदेशीरपणे चालणारे 11 नाईट क्लब बंद केले होते.

याच अनुषंगाने एक महत्वाची बातमी हाती येतेय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्यावसायिक आणि विक्रीकर विभागाने कळंगुट- बाग या किनारी भागातील नाईट क्लबवर छापा टाकलाय.

कळंगुटमधील डान्सबार सील केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी डान्सबारमधील आस्थापनांचे जीएसटी रेकॉर्ड देखील तपासण्यात आलंय.

आज शनिवारी (13 जानेवारी) रात्रौ 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाईवेळी प्रशासनातील कोणते अधिकारी उपस्थित होते यांची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाहीय.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चालणाऱ्या बेकायदेशीर नाईटक्लबचा मुद्दा गाजत होता. कळंगुट -बागा-वागातोर- हणजूण सारख्या किनारी भागात चालणाऱ्या नाइटक्लब, डान्सबार व मसाज पार्लरच्या नावाखाली अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इतर बेकायदेशीर कृत्यांमध्ये वाढ होऊन यापरिसराचे नाव बदनाम होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून सरकारने पोलीस आणि संबंधित खात्याला या प्रकरणी कडक कारवाईचे आदेशही दिले होते. सार्वजनिक सुरक्षा, सुव्यवस्था आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून कडक पाऊले उचलली गेली असल्याचे समजतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

SCROLL FOR NEXT