Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: पर्रीकरांविषयी आदर व्यक्त; मात्र बाबूश यांच्यावरच्या कारवाईबाबत भाजपचे मौन

Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या धिम्यागतीच्या कारभारामुळे उत्पल पर्रीकर यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या कामावरून गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर आणि आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती.

विशेष म्हणजे हे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच असून बाबूश यांनी केलेल्या वक्त्यव्यावर भाजपातील कोणतेही मंत्री अथवा पदाधिकारी बोलायला तयार नसल्याचे चित्र कालपर्यंत दिसून आले होते.

मात्र आज शनिवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बाबूश यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. मनोहर पर्रीकर आमचे मोठे नेते असून क्षुल्लक राजकारणासाठी त्यांचे नाव खराब करू नका असे सावंत म्हणाले.

तर सावंत यांच्या प्रतिक्रियेची री ओढत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनीही आपले मत व्यक्त केलंय.मनोहर पर्रीकर यांचे नाव कोणीही वैयक्तिक फायद्यासाठी वापरू नये.

पर्रीकर हे आमच्या पक्षाचे मोठे नेते असून बाबूश यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक विधान असल्याचे तानवडे म्हणाले.

असं जरी असलं तरी बाबूश यांच्या त्या विधानावरून पक्ष कारवाई करणार का यावर मात्र तानवडे यांनी मौन बाळगलेले दिसून आले.

खरं तर स्मार्ट सिटीच्या धिम्यागतीने सुरु असलेल्या कारभारामुळे उत्पल पर्रीकर यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांचे चिरंजीव आणि विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.

पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली खोदकामात चाललेली दिरंगाई ही केवळ इलेक्शन फंडिंगसाठी असल्याचा खळबळजनक आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला होता.

यावर उत्तर देताना बाबूश यांनी तकालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला होता. मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच स्मार्टसिटीची वाट लागली आहे.

कारण त्यांच्या काळात ज्या व्यवस्थापकीय संचाकची नेमणूक केली ती कोणी केली होती? त्यावेळच्या पर्रीकरांच्या कर्माची फळाचं आज आम्ही भोगतोय असे खळबळजनक वक्तव्य बाबूश यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT