Suchana Seth Dainik Gomantak
गोवा

Candolim Murder Case: अखेर सूचना घटनास्थळी जाण्यास तयार, सिकेरीतील 'त्या' हॉटेलवर रिक्रिएट होणार घटनाक्रम

Candolim Murder Case: कळंगुट पोलीस तिला घेऊन हॉटेलकडे रवाना झाले आहेत

Ganeshprasad Gogate

Candolim Murder Case: संशयित आरोपी सूचना सेठ ही कालपर्यंत हॉटेलमधील क्राईम सीन रीक्रिएट तयार करण्याकरिता तयार नव्हती.

मात्र आज म्हणजेच 12 जानेवारीला सूचनाने सीन रीक्रिएट तयार करण्याकरिता सहमती दर्शवली असून कळंगुट पोलीस तिला घेऊन हॉटेलकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

कळंगुट पोलीस स्टेशन मधून आज म्हणजेच शुक्रवारी (12 जानेवारीला) संध्याकाळी 4.15च्या दरम्यान पोलीस सूचनेला घेऊन त्या हॉटेलकडे रवाना झाले आहेत.

सिकिरी हॉटेलमध्ये घडलेल्या चार वर्षीय मुलाच्या या खून प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. संशयित आई सूचना सेठला अटक केल्यानंतर तिला म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काल म्हणजेच गुरुवारी (11 जानेवारीला) पोलिसांना पंचनाम्यावेळी आयलायनरमध्ये टिशू पेपरवर 5-6 ओळींमध्ये इंग्लिशमधून लिहिलेली एक नोट सापडली होती.

तो पेपर फाटलेला आणि चुरगळलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी तो फॉरेन्सिक लॅब कडे पाठवला होता.

त्या नोटवरील मजकुरावरून ती मानसिकदृष्ट्या खचलेली असल्याचे समजत होते. तसेच कालपर्यंत सूचना पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

आज सकाळपासून पोलीस तिला गुन्हा घडलेल्या ठिकाणी म्हणजेच हॉटेलमध्ये सीन रीक्रिएट करण्यासाठी तयार करत होते.

मात्र सूचना तपासासाठी सहकार्य करत नव्हती. परंतु संध्याकाळी सूचना सीन रीक्रिएट करण्यासाठी तयार झाल्याने पोलीस तिला घेऊन हॉटेलकडे रवाना झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

SCROLL FOR NEXT