mopa airport incident report Dainik Gomantak
गोवा

Goa News: मनोहर विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.

गोमंतक ऑनलाईन टीम

भोम-अडकोण पंचायतच्या ग्रामसभेत ठराव

बाणास्तारी येथील नवीन मार्केट प्रकल्पात स्वस्त धान्य दुकानासाठी आवश्यक जागा देण्याचा भोम-अडकोण पंचायतच्या ग्रामसभेत ठराव.

सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

पेडणे तालुका सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे माजी निवृत्त शिक्षकांचा, प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शक शिक्षक व यशवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम पेडणे शिक्षण विभागाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला.

गोव्याच्या मनोहर विमानतळावर मोठी दुर्घटना टळली!

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Manohar International Airport) एक अत्यंत गंभीर घटना घडली होती, ज्याचा आता अंतिम अहवाल समोर आला आहे. 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) ने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एक विमान (VT-EXT) चुकून धावपट्टीऐवजी टॅक्सीवेवरून (Taxiway) उड्डाण करण्याचा प्रयत्न करत होते. 'एअर ट्राफिक कंट्रोल' (ATC) च्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

भोमा येथील रस्त्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सावंत यांचे स्पष्टीकरण नाही

भोमा येथील रस्त्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. या प्रलंबित प्रश्नाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची ग्रामसभेत मागणी

मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

गिमोये, मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांच्या घराचा मोठा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याने मोठे नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली. घराचा उर्वरीत भाग सुध्दा कोसळण्याच्या स्थितीत. मोरजकर यांना लवकरच घर बांधून देण्याचे आमदार डॉ. देविया राणे यांचे आश्वासन

भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात एक दिवस चालणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष श्री. दामू नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सरोज पांडे आणि राज्यसभा खासदार श्री. सदानंद शेट तानावडे यांनी वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.

कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या एका अपघातात एका स्कूटर चालकाला दुखापत झाली. एका कारने मागून दुसऱ्या वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामुळे अनेक कार आणि एका स्कूटरची साखळी आदळली.

गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

पाटवळ- खोतोडा येथील सावंत चित्रशाळेत गणेश मूर्ती तयार करण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर. दरवर्षी अंदाजे १५० पेक्षा अधिक करतात गणेश मूर्ती. पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

कुडतरी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सय्यद अली (५७, रा. डोंगरी, मुंबई) याला अटक केली. त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Goa Live News: वाळपई बसस्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती पहा...

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

SCROLL FOR NEXT