Uday Bembre Dainik Gomantak
गोवा

मराठी - कोकणी वाद आणखी चिघळणार? मावजोंच्या समर्थनात भेंब्रेंचा Video, 'शांत बसणार नाही', म्हणत इशारा

Marathi- Konkani Agitation: उदय भेंब्रे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत युट्युबवर एक व्हिडीओ शेअर केला

गोमन्तक डिजिटल टीम

Marathi- Konkani Controversy

पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि कोकणी भाषेचा वाद सुरु आहे. गोव्यातील काही विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते वेळोवेळी या वादाला अनुसरून मत व्यक्त करत असतात.

आज देखील गोव्यातील साहित्यिक उदय भेंब्रे यांनी "मावजो यांनी माफी का मागावी?" अशी प्रतिक्रिया व्यक्त करत युट्युबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

उदय भेंब्रे त्यांच्या सदर युट्युब व्हिडिओमधून कोकणीचा राजभाषा कायद्यात असलेला उल्लेख व्यक्त करत अशी भाषा केवळ बोलीभाषा कशी असू शकते असे सवाल उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार गोव्यातील ९५ टक्के स्थनिक कोकणी भाषा बोलतात आणि म्हणूनच मावजो यांनी कोकणीला राज्य भाषेचा दर्जा मिळावा असे केलेले विधान इतर भाषेचा अपमान ठरत नाही.

याउलट मराठीवादी लोकांच्या मनात असलेल्या अहंगंडामुळे ते कोकणी भाषेचा तिरस्कार करीत असल्याचे रोखठोक विधान केले आहे.

डॉ. अनुजा जोशी यांनी कोकणीचा बोली भाषा म्हणून केलेला उल्लेख हा केवळ मावजो यांचा अपमान नाही तर समस्त कोकणी समाजाच अपमान असून यानंतर कोकणी विरोधात असे विधान करताना दोनवेळा विचार केला जावा कारण शांत असलेला कोकणी समाज हा प्रत्येकवेळी शांत बसणार नाही असे म्हणत त्यांनी मराठीप्रेमी लोकांना इशारा दिला.

सदर व्हिडिओमध्ये ते डॉ. अनुजा जोशी या स्वतः मराठी भाषिक असल्यामुळे कोकणीच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत असा उल्लेख केला, त्यांच्यासारख्या साहित्यिकेने अशा प्रकारे इतर भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही असे म्हणत त्यांनी मराठीवादी समाजाला थेट उत्तर दिले आहे.

जसा इतर प्रदेशातील लोकांना त्यांच्या संबंधित भाषांचा अभिमान असतो तसाच गोव्यातील लोकांना कोकणीचा अभिमान असल्याने डॉ. अनुजा जोशी यांनी स्थानिकांच्या भावना दुखावल्यामुळे माफी मागितली पाहिजे असे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT