Mulgao Mining Meeting  Dainik Gomantak
गोवा

Goa News: खनिज प्रश्नी मुळगावात बैठक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News 27 January 2025: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Sameer Panditrao

Mulgao Mining: खनिज प्रश्नी मुळगावात बैठक

गावचे प्रश्न अगोदर सोडवा नंतर खाण सुरु करा! मुळगाववासीय निर्धाराशी ठाम. 'खनिज' प्रश्नी मुळगाव ग्रामस्थ आणि 'वेदांता'च्या अधिकाऱ्यांची बैठक सुरु.

Anjuna Accident: बांधकामाच्या ठिकाणी ट्रक उलटून चालक गंभीर जखमी

अंजुना-वागातोर येथील बांधकामाच्या ठिकाणी एक काँक्रीट मिक्सर ट्रक रिव्हर्स घेताना उलटला. या घटनेत चालकाच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर GMC रुग्णालयात हलवण्यात आले. अंजुना पोलीस घटनास्थळी असून पंचनामा करत आहेत आणि या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ranji Trophy: गोवा क्रिकेट संघ रणजी प्लेट करंडकाचा मानकरी

गोव्याने नागालँडविरुद्धचा सामना जिंकून रणजी प्लेट करंडकावर नाव कोरले आहे. कॅप्टन दर्शन मिसाळने पाच विकेट पटकावल्या तर स्नेहल कवठणकर सामनावीर आणि मालिकावीर ठरला .

डॉ. सुंदर धुरी गोवा विद्यापीठाचे नवे कुलसचिव

डॉ. सुंदर धुरी यांनी गोवा विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा भार स्वीकारला. सत्तरीचे सुपुत्र असलेले डॉ. धुरी गोवा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सचे अकादमीक वाईस डीन तसेच इंटर्नल क्वालिटी एशुअरन्स संचालकपदी होते.

Usgao: उसगांवात उसाच्या ढिगाला आग

उसगांव येथे साठवुन ठेवलेल्या उसाच्या ढिगाला आग. अग्नीशामक दल घटनास्थळी. लाखोंचे नुकसान.

Libia Lobo Sardesai: मुख्यमंत्री सावंत, खासदार तानावडेंनी केले ॲड. लिबियांचे अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी प्रख्यात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड. लिबिया लोबो सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

Valpoi: वाळपईत दोन डुक्कर वाहतूक करणारे ट्रक जप्त

वाळपई पोलिसांनी दोन डुक्कर भरलेले ट्रक जप्त केले. 42 जिवंत डुक्करं घेऊन कर्नाटकातून गोव्यात ट्रक आला होता. याबाबतीत पुढील तपास सुरू आहे.

Dona Paula: खासगी बसची डोना पावला जेटीच्या गेटला धडक

ब्रेक फेल झाल्यामुळे खासगी बस डोना पावला जेटीच्या गेटला धडकली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शिरगावात स्टोअर रूमला आग, चार लाखांचे नुकसान

शिरगाव येथे घराच्या स्टोर रूमला आग लागली. यात जवळपास चार लाखांपेक्षा अधिक किमतीचा ऐवज भस्मसात झाला. आगीचे कारण अजून अस्पष्ट आहे.

Xeldem: शेल्डेतील गटार कामामुळे स्थानिक रहिवाशांसाठी सुरक्षा समस्या

शेल्डे येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळ असलेल्या अंतर्गत रस्त्यावर सुरू असलेल्या गटार कामामुळे स्थानिक रहिवाशांसाठी मोठी सुरक्षा समस्या निर्माण झाली आहे, कारण या भागात आवश्यक सूचना फलक आणि सुरक्षा उपायांचा अभाव आहे, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

Sattari: सत्तरी येथील नदीत २३ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

कुमठल, सत्तरी येथे प्रदीप कुमार (२३, राजस्थान) हा तरुण नदीत बुडाला. अंधार आणि वनक्षेत्रामुळे वाळपई अग्निशमन दलाचे शोधकार्य थांबले.

Mulgao: खाणप्रश्नी मुळगाववासी आक्रमक..!

महिलांसह 300 हून अधिक लोकांनी रविवारी खाणीवर धडक दिली. आधी गावचे प्रश्न सोडवा आणि नंतरच खाणीचा विचार करा असा संतप्त लोकांनी इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT