CM Pramod Sawant, Budget Meeting X
गोवा

Goa News: मुख्यमंत्री डॉ. सावंतांची शिष्टाई, इंदौरहून विमान गोव्यात दाखल होणार; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी मराठीमध्ये.

Akshata Chhatre

मुख्यमंत्री डॉ. सावंतांची शिष्टाई, इंदौरमधून रात्री आठ वाजता विमान गोव्यात दाखल होणार

इंदौर येथे एयर इंडियाचे विमान नादुरुस्त झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळाच्या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची शिष्टाई. रात्री 8 वाजता इंदौरहून अडकून पडलेल्या प्रवाशांना घेऊन गोव्यासाठी निघणार विमान. दुपारी बारा वाजता निघणारे विमान नादुरुस्त झाल्याने इंदौर येथे अडकलेले प्रवासी अजूनही आहेत तिथेच.

भूतखांब- केरी येथील जंगलात आढळला 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

भूतखांब- केरी येथील जंगलात श्रीकांत सतरकर (५५, खांडेपार) याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. म्हार्दोळ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

लईराईच्या कौलांना गर्दी नको! शेवटच्या दिवशी बाहेरच्यांना प्रवेश नाही, पुढच्या वर्षी दुकानांवर निर्बंध

लईराई देवीच्या सुरू असलेल्या कौल प्रसादाला लोकांनी गर्दी करु नये. तसेच कौलांच्या शेवटच्या पाचव्या दिवशी बाहेरच्या लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. पुढच्या वर्षीपासून दुकानांवर येणार निर्बंध. मुड्डेर ते होमखंडापर्यंत दुकाने घालण्यावर येणार निर्बंध.देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर यांनी केले जाहीर.

दुसऱ्या विमानाची अजून सोय नाही; गोमंतकीय अडकले

इंदूर - गोवा एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याने अनेक गोमंतकीय अडकले. आठ वाजता विमानतळ बंद होणार असून दुसऱ्या विमानाची देखील अजून सोय नाही. प्रवाशांमध्ये नाराजी.

मुख्यमंत्र्यांनी केले सुर्या नयेकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चेंगराचेंगरीत निधन झालेल्या पडोसे येथील सुर्या नयेकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मयत धोंडगणांना १२ दिवसांनंतर आर्थिक सहाय्य दिले जाईल. जत्रोत्सवात धोंडगणांनीही शिस्त राखणे आवश्यक आहे. प्रशासकीय पातळीवरून सर्व गोष्टींचा निहाय घेऊन व्यवस्था केली जाणार. चौकशी समितीचा अहवाल उद्यापर्यंत हाती येईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दूधसागर नदीवर अंघोळीसाठी आलेल्या लोकांना मारहाण करण्याचा इशारा

ओकांब- धारबांदोडा येथील दूधसागर नदीवर अंघोळीसाठी आलेल्या लोकांना रविवारी स्थानिक लोकांनी पोलिसांच्या सहकार्याने हाकलून लावले. यापुढे नदीवर आंघोळसाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांचा टायर पंचर करण्याचा तसेच मारहाण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पालकांचा निष्काळजीपणा बेतला जीवावर; झोपाळ्याचा गळफास लागून चिमूकली ठार

इंदूर विमानतळावर गोंधळ‌ वाढला, कारवाईचे संकेत

एअर इंडियाच्या इंदूर - गोवा विमानात बिघाड झाल्याने प्रवाशांना उतरवले खाली. हे विमान इंदूर हून मोपा विमानतळावर उतरणार होते. आता प्रचंड गोंधळाची परिस्थिती. बीएसएफ जवानांचे प्रवाशांवर कारवाईचे संकेत.बैठक सुरू.

इंदौर-गोवा विमानात बिघाड,प्रवाशांची गैरसोय

एअर इंडियाच्या इंदौर - गोवा विमानात बिघाड. दुपारी १२.२० वाजता निघणारे विमान अजून पडलेय अडकून.आता शेवटी प्रवाशांना विमानातून उतरवले खाली.

राणे यांचा ग्रीन लंग्स उपक्रम, मडगाव येथे जमीन ओळखण्यास सुरुवात

वनमंत्री विश्वजित राणे यांच्या ग्रीन लंग इनिशिएटिव्ह संकल्पनेला सुरुवात झाली. आमदार दिगंबर कामत यांच्यासह वन, शहर विकास विभागाने मडगावमधील अनेक जमिनींची पाहणी केली. सोनसोडो साइटसह ग्रीन लंग विकसित करण्यासाठी २-३ क्षेत्रे ओळखली गेली आहेत.

दूधसागर नदीवर कुळे पोलीस स्थानकाचे कर्मचारी तैनात

ताकार- दावकोण येथील दूधसागर नदीवर कुळे पोलीस स्थानकाचे कर्मचारी तैनात. नदीवर आंघोळीसाठी येणाऱ्यांना लावले हाकलून.

चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या कुटुंबाची राज्यपालांनी घेतली भेट

शिरगाव येथे गुरुवारी चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या पडोसे (सत्तरी) येथील सूर्या नयेकर यांच्या कुटुंबाची राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी भेट घेतली.

तुये येथील बिबट्याला पकडण्यात यश

गेल्या काही दिवसांपासून गावात दहशद माजवलेल्या तुये येथील बिबट्याला पकडण्यात यश.

पीआय सुनील गुडलर व पोलिस शिपाई मोहम्मद हुसेन यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

लाचप्रकरणी निलंबित  पीआय सुनील गुडलर व पोलिस शिपाई मोहम्मद हुसेन या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजया आंब्रे यांनी या दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी फर्मावली. त्यानंतर दोघांनाही  कोलवाळ तुरुंगात पाठवून  देण्यात आले. दरम्यान, या संशयितांचा जामीन अर्जही  न्यायालयाने फेटाळून लावला.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT