Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय अधिकृत खोदकाम करु नका' मंत्री कामतांनी स्पष्टच सांगितले; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर

गोमंतक ऑनलाईन टीम

"रस्ते खराब स्थितीत आहेत, ही वस्तुस्थिती, त्यांची दुरुस्ती करणे ही माझी जबाबदारी" मंत्री कामत

रस्ते खराब स्थितीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्यांची दुरुस्ती करणे ही माझी जबाबदारी आहे. मुख्य अभियंत्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही खोदकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल: सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत

BJYMकडून आमदार वेंझी व्हिएगास आणि खासदार विरियाटो फर्नांडिस यांच्याविरुद्ध तक्रार

BJYMने आमदार वेंझी व्हिएगास आणि खासदार विरियाटो फर्नांडिस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

"मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय अधिकृत खोदकाम करू नये" मंत्री कामत

मुख्य अभियंत्यांच्या परवानगीशिवाय अधिकृत खोदकाम करू नये.उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल: सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत

पैरा-मये येथे घराला टेकून असलेल्या झोपडीला आग

पैरा-मये येथे घराला टेकून असलेल्या झोपडीला आग. झोपडीत ठेवलेले कपडे, भांडी आदी सामान आगीच्या भक्ष्यस्थानी. एक लाखाहून अधिक रुपयांची नुकसानी

धारबांदोडा पंचायत सरपंच विनायक गांवस यांनी दिला राजीनामा

धारबांदोडा पंचायत सरपंच विनायक गांवस यांनी दिला राजीनामा.११ सप्टेंबर रोजी पंचायत संचालक जवळ दिला होता राजीनामा पत्र.सरपंच पदाची निवडणूक होई तोपर्यंत उपसरपंच सांभाळतील सरपंचाचा कारभार.

साखळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दयानंद बोर्येकर बिनविरोध

साखळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दयानंद बोर्येकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी बोर्येकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.

संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव कार्यक्रमांला पाठिंबा

आम्ही संयुक्त राष्ट्रांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. त्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव कार्यक्रमांबद्दल सकारात्मक संकेत दाखवले. संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव कार्यक्रमांला पाठिंबा आहे असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले

भाजपकडून गणेश गावकरच!

विधानसभा सभापतीपदासाठी भाजपकडून सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचा अर्ज सादर. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री विश्वजीत राणे, सुदिन ढवळीकर यांच्यासह इतर आमदारांची होती उपस्थिती

वाडे-प्रियोळ येथील विश्वजीत देसाई यांच्या घराजवळ दुसऱ्यांदा बिबट्या

वाडे-प्रियोळ येथील विश्वजीत देसाई यांच्या घराजवळ दुसऱ्यांदा बिबट्या. बिबट्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातही बिबट्या आला होता दरवाज्यापर्यंत

साखळी बाजारात दोन दुकानांना आग

साखळी बाजारातील किराणा माल व कपडे विक्री अशा दोन दुकानांना रात्री उशिरा आग लागून सर्व सामान पूर्णपणे जळून खाक. सुमारे ४० लाखांची हानी. अथक प्रयत्नांनंतर डिचोली अग्निशामक दलाचे आग आणली आटोक्यात

बोरी येथे मंगळवारी पहाटे, १,४३,३०० रुपये किंमतीचा गांजा जप्त

बोरी येथे मंगळवारी पहाटे फोंडा पोलिसांनी गांजा बाळगल्या प्रकरणी सनी सुंदर नाईक (३३, बोरी) याला केली अटक. १,४३,३०० रुपये किंमतीचा गांजा जप्त.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC पाकिस्तान क्रिकेट टीमवर बंदी घालणार? दोन आठवड्यात होणार निर्णय, सोशल मीडियावर रंगली चर्चा

High Court: ‘कथित धर्मांतरणा’चा गुन्हा रद्द, पास्टर डोमिनिक आणि पत्नी जोनला हायकोर्टाचा मोठा दिलासा, याचिका काढली निकाली!

रामा यांच्या हल्ल्यामागे विद्यमान मंत्र्याचा हात? काँग्रेस आमदार फेरेरांचा संशय, 'गॉडफादर'चे नाव जाहीर करण्याचे पोलिसांना आवाहन

Borim Drugs Seized: बोरी येथे गांजा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक; 1.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shah Rukh Khan: किंग खानला मिळाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार, पत्नी गौरीची भावनिक पोस्ट; म्हणाली, 'अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ’

SCROLL FOR NEXT