गोवा

Goa News: भाजप मंडळ अध्यक्षपदांची निवड आणि गोव्यातील घडामोडी

Marathi Breaking News 5 January 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

वाळपईत भाजप मंडळ अध्यक्षपदी रामा खरवत याची बिनविरोध निवड

वाळपई मतदार संघ. भाजप मंडळ अध्यक्षपदी श्री. रामा खरवत (नगरगाव धावे) याची बिनविरोध निवड. रामा हे नगरगाव पंचायत उपसरपंच म्हणून कार्यरत. मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून अभिनंदन.

बिबट्याला पकडण्यासाठी सापळा..!

अपघातात जखमी झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याकडून प्रयत्न. साष्टीवाडा-बोर्डे परिसरात लावला पिंजरा.

मुख्यमंत्र्यांच्या 'भिवपाची गरज ना' घोषणेचा निलेश काब्रालांकडून समाचार

एका वर्षापुर्वी मुख्यमंत्र्यांनी कुडचडेत हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी 'भिवपाची गरज ना, रडपाची गरज ना' अशी मोठी भाषणे दिली होती. मात्र अजूनपर्यंत काहीच झालेले नाही. विकासाचे अनेक प्रकल्प कुडचडेत रखडले आहेत. भाजपचे आमदार माजी मंत्री निलेश काब्रालांचा घरचा आहेर.

प्रियोळ भाजप मंडळ अध्यक्षपदी अनिशा गावडे यांची निवड

प्रियोळ भाजप मंडळ अध्यक्षपदी केरी पंचायतीच्या माजी सरपंच अनिशा गावडे यांची निवड.

पणजी भाजप अध्यक्षपदी ब्रिजेश शेट्ये

पुंडलिक उर्फ ब्रिजेश शेट्ये पणजी भाजप मंडळ अध्यक्ष. ब्रिजेश भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य आहेत.

मंडळ अध्यक्ष निवड,फोंड्यात रवींची दळवींवर मात!

फोंडा भाजप मंडळ अध्यक्षपदी आमदार मंत्री रवी नाईकांचे समर्थक खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच,विद्यमान पंच हरीश नाईक यांची निवड. भाजपच्या विश्वानाथ दळवी गटावर मात‌.

खोतोडे- सत्तरी येथे एमआरएफ शेडका आग

खोतोडे- सत्तरी येथे एमआरएफ शेडका आग लागली, मात्र अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात

सत्तरी गोळीबार प्रकरण: आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

पाटवळ सत्तरी येथे बेकायदेशीररित्या जनावरांची शिकार तसेच गोळी लागून समद खान (२२) याच्या मृत्यू प्रकरणी बाबु उमर संघार व गाऊस नुर अहमद पटेल यांच्या पोलिस कोठडीत डिचोली न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT