हवामान खात्याने २७ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट तर २८ ते ३० रोजी यलो अलर्ट दिला आहे. या तीन दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कर्नाटकातील कोप्पल येथे २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या १३व्या राष्ट्रीय पिनाक सिलट स्पर्धेत भाग घेण्यासाठी गोव्याचा संघ रवाना झाला. सिंगा, मकन, प्री-टीन, सबज्युनियर आणि ज्युनियर गटात संघ सहभाग घेणार आहे.
साखळी बाजारात भाजी विक्री करणाऱ्या एका वृध्द महिलेला एका इसमाने संमोहित करून लुबाडले. तिच्या हातातील सोन्याची पाटली व गळ्यातील सोनसाखळी लांबवली. पोलीस तक्रार दाखल, तपास सुरू.
पणजी जेएमएफसी न्यायालयाने रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील झेनीटो कार्डोझोसह ८ आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना पुढील सुनावणीसाठी १० ऑक्टोबरला न्यायालयात हजर करण्यात येईल.
ग्रामपंचायतवार स्थापित ग्राम स्वच्छता व पोषण समितीची यादी तसेच या समितीच्या मागील बैठकीचे इतिवृत सादर करावे, असे निर्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच सर्व सदस्यांना आमंत्रित करून नियमित बैठका घेणे, साथीचे रोग तसेच कचरा व्यवस्थापनात जागरूकता निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले.
ताळगाव-कार्दोजवाडो डीटीसीवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत एसबीआय बँक, कार्दोज वाडो आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही.
कृषी मंत्री रवी नाईक यांना कोडार वासियांचे आयआयटी विरोधात निवेदन.
राया येथे दुचाकीस्वारावर झाड कोसळले. चालकाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे.
‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत ५० हजारांपेक्षा जास्त व एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी ‘जीआयएस’ आधारित कृती आराखडा तयार करण्याच्या अंमलबजावणीचे निरीक्षण, पुनरावलोकन करण्यासाठी नगरविकास खाते सचिवांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांचा समावेश असलेली सल्लागार मूल्यांकन आणि पुनरावलोकन समिती (सीईआरसी) स्थापन करण्यात आली आहे. खात्याच्या संचालकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.