Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa News: तोतया अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! सरकारी विश्रामगृहात रुम बुकिंग करणाऱ्या संशयितांना अटक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Today's Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी. गोव्यातील राजकारण, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

Goa Crime: तोतया अधिकाऱ्यांचा पर्दाफाश! सरकारी विश्रामगृहात रुम बुकिंग करणाऱ्या संशयितांना अटक

सरकारी अधिकारी असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखवून सरकारी विश्रामगृहात खोलीचे बुकिंग करणाऱ्या संशयित दीपक गायकवाड आणि रामराजे साहेबराव शिंदे यांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली.

Goa Crime: महिलांचा पाठलाग आणि लैंगिक छळाप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक; पणजी पोलिसांची कारवाई

महिलांचा पाठलाग आणि लैंगिक छळाच्या गुन्हेगारीत सामील असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ग्लोन पेडणेकर (वय वर्ष 27, करंजाळे) असे या आरोपीचे नाव आहे.

Goa Accident: भीषण आग लागल्याने मोइरा गावात वोक्सवागन पोलो पूर्णपणे नष्ट

मोइरा गावात आग लागून वोक्सवागन पोलो पूर्णपणे नष्ट झाली. आग जवळच्या महिंद्रा झायलोमध्ये पसरली, परंतु अग्निशामक आणि स्थानिकांनी ती आटोक्यात आणली. कोणतीही दुखापत झाली नसून पोलीस तपास करत आहेत.

Goa Police: उदय भेंब्रे यांच्या विरोधात तक्रार

शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी उदय भेंम्ब्रे यांच्या विरोधात फोंडा आणि मडगाव पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Goa News: अशोक नाईक व इतरांना मोठा दिलासा!

गोमंतक भंडारी समाजाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ॲड. अनिश बकाल व ॲड. अतिश मांद्रेकर यांनी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक व इतर समिती सदस्यांविरुद्ध पणजी पोलिसात दाखल केलेली तक्रार मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द. अशोक नाईक व इतरानी दिले होते उच्च न्यायालयात या तक्रारीविरुद्ध आव्हान.

Goa Accident: पोलीस बसची धडक; धुळेर अपघातात माय-लेक जखमी

धुळेर- म्हापसा येथे 'हिट अँड रन' अपघात. पोलीस बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिला व चार वर्षीय लहान मुलगा जखमी.

Goa Temple Issue: खापेश्वर देवस्थान मोडल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक; बार्देशचे संयुक्त मामलेदार, कंत्राटदारासह पर्वरी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

पर्वरी येथील श्री खापेश्वर देवस्थान मोडल्याप्रकरणी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी बार्देशचे संयुक्त मामलेदार, उड्डाणपूल कंत्राटदार आणि पर्वरी पोलिसांविरोधात गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.

Uday Bhembre: उदय भेंम्ब्रे यांच्याविरोधात अखिल गोमंतकीय क्षत्रिय मराठा समाजातर्फे 'निषेध सभा'

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या गोव्यातील प्रसिद्ध साहित्यिक उदय भेंम्ब्रे यांच्याविरोधात मंगळवार (दि. ४ फेब्रुवारी) रोजी निषेध सभा होणार आहे. अखिल गोमंतकीय क्षत्रिय मराठा समाजातर्फे ही सभा आयोजित करण्यात येणार आहे.

Rohan Khaunte: या राजकारणात मी पडणार नाही!" पर्वरीचे आमदार, पर्यटनमंत्री रोहन खवंटे

"पर्वरीतील खाप्रेश्वर मंदिराच्या संदर्भात राजकारण सुरु आहे मी यावर काहीही बोलणार नाही" : पर्वरीचे आमदार, पर्यटनमंत्री रोहन खवंटे

Savardem Goa: सावर्डे पंचायतीने विकत घेतले साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशनकडून कचरा संकलन वाहन

साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन द्वारे निधी उपलब्ध करून दिलेले पहिले कचरा संकलन वाहन सावर्डे पंचायतीने विकत घेतले आहे, ज्यामुळे वर्षाला सुमारे 6 लाख खर्चाच्या भाड्याच्या सेवांची गरज संपुष्टात आली आहे.

Porvorim Banyan Tree: पर्वरीतील वडाचे झाड उपटले; सुकूर येथे होणार स्थलांतर

पर्वरीमधील वटवृक्ष तीन विभागात उपटण्यात आले असून हे झाड सुकूर येथील पीडब्ल्यूडी क्षेत्रात स्थलांतरित केले जाईल.

Porvorim Traffic: वाहतूक वळवल्याने संगोल्डा रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी

गिरीतून पर्वरी वाहतूक संगोल्डा येथे वळविण्यात आल्याने संगोल्डा रस्त्यावर झाली वाहतूक कोंडी.

Goa Accident: अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कुंक्कळीतील स्थानिक ठार; "बायपासचे काम सुरु करा" स्थानिकांची मागणी

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने संतोष नाईक वय 32 कुंक्कळी येथे जागीच ठार. पोलीसांनी पंचनामा केला असता बायपासचे काम सुरु करावे अशी मागणी लोकांनी केली, हा NH 17 रस्ता अतिशय अरुंद आहे व या रस्त्यावर दररोज अपघात होत असतात.

Porvorim News: पर्वरी मंदिर स्थलांतर: कळंगुटचे आमदार मायकल लोबो घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

पर्वरी येथील खाप्रेश्वर मंदिराच्या स्थलांतरामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल रात्री पर्वरी येथील श्री खापरेश्वर देवस्थानला भेट दिली, "मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन" असे सांगितले.

Goa News: अखेर खाप्रेश्वराच्या मूर्तीचे स्थलांतर झालेच!

पर्वरी उड्डाणपूलाच्या कामासाठी राखणदार खाप्रेश्वराला अखेर पहाटे निखळवले. मंदीरही जमिनदोस्त.वडाचे झाड स्थलांतरीत करण्यासाठी प्रक्रिया सुरू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT