गोवा

Goa News: भोमचा विषय सोडवण्यात सावंत सरकारला अपयश, संजय नाईकांचा घणाघात; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या बातम्या

गोमंतक ऑनलाईन टीम

भोमचा विषय सोडविण्यात विद्यमान सरकारला अपयश

भाजप सरकार निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करीत आहे. भोमचा विषय सोडविण्यात विद्यमान सरकारला अपयश. भोम गावातील लोकांना सहकार्य करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रितपणे सहकार्य करावे - संजय नाईक

राज्यात अॅप-आधारित टॅक्सी सेवा सुरू केल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका

गोव्यातील स्थानिक टॅक्सी मालकांना भीती आहे की राज्यात अॅप-आधारित टॅक्सी सेवा सुरू केल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. त्यांना चिंता आहे की या सेवांसाठी सर्व टॅक्सी चालक इतर राज्यांचे असतील, ज्यामुळे स्थानिक ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या पारंपारिक टॅक्सी व्यवसायात व्यत्यय येण्याचा धोका आहे.

मडगाव, जुने बाजार येथे कार अपघात

शनिवारी मडगाव येथील जुने बाजार येथे एक कार अपघात झाला, ज्यामध्ये चालकाने असा दावा केला की तो चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला टाळण्यासाठी वळला, ज्यामुळे गाडी उलटली

कृषी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते गौरव

फोंडा गोमंतक भंडारी समाजतर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा कृषी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते गौरव.

कुळेत भीषण अपघात; एक ठार

कुळे वाकीकुयण शिगाव येथे तीन वाहनांमध्ये अपघात. एक दुचाकी चालक ठार. दुसऱ्या दुचाकी चालकाने आपल्या दुचाकीवरुन उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. पोलीस घटनास्थळी दाखल. पंचनामा सुरु.

हवामान अपडेट; गोव्यात यलो अलर्ट

१, २ आणि ३ जून रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडी गोव्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

गोव्यात 'पाण्यावरून' झालेल्या वादात दोन जणांना शिक्षा!

२०२० मध्ये वेर्ला, काणका येथे रस्त्यावर पाणी शिंपडल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी दोन आरोपींना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या घटनेत आरोपींनी तक्रारदाराच्या घरात घुसून, शिवीगाळ करत त्याची गाडी तोडली आणि त्याला लाकडी पट्टीने मारहाण केली होती.

खड्ड्यात पडून ४६ वर्षीय स्कूटर स्वार मारुती जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू

दाबोळीजवळील एका खड्ड्यात पडून ४६ वर्षीय स्कूटर स्वार मारुती जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू. वास्को पोलिसांनी संबंधित साइट अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

'रंग दे बसंती' फेम आर माधवन यांचा वाढदिवस!!

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केला खून

वाडा, शिरोडा येथे पत्नीचा खून करुन पती पोचला फोंडा पोलिस स्थानकात. मिळालेल्या प्राथमीक माहितीनुसार आरोपी पती फोंडा मामलेतदार कचेरीत कामाला होता तर मयत पत्नी शाळेत शिक्षिका होती. दोघांना लहान मुलही आहे. फोंडा पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT