Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa News: "जॉब आहेत, ते स्वीकारण्याची तयारी ठेवा", मुख्यमंत्री सावंतांनी स्पष्टच सांगितले; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घटना

गोमंतक ऑनलाईन टीम

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बेकायदेशीर ऑनलाइन जुगार खेळल्याबद्दल सांकवाळ येथे पाच जणांना अटक

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० आशिया कप सामन्यावर बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजीची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर वेर्ना पोलिसांनी सांकोआले येथील एका व्हिलामध्ये छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी पाच जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून ५४ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, राउटर, एक टीव्ही, १७ बँक पासबुक आणि १० लाख रुपयांचे सामान जप्त केले. आरोपी मध्य प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील आहेत आणि झुआरीनगरमध्ये राहत होते.

नोकऱ्या नाहीत की तरुणांना त्या करायच्या नाहीत?

गोव्यातील तरुण आणि नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी थेट भाष्य केले आहे. राज्यात सुरू असलेल्या ‘सेवा पखवाडा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने’च्या अंतर्गत १०० टक्के रोजगाराचा फायदा गोव्यातील लोकांना कसा होईल, यावर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, राज्यात खरोखर नोकऱ्यांची कमतरता आहे की, असलेल्या नोकऱ्या लोकांना करायच्या नाहीत, असा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर

नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. नवरात्रीनिमित्त ते श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले असून, सोमवारी सकाळी त्यांनी सपत्निक दर्शन घेतले. फळदेसाई यांच्याबरोबर खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले हेही सपत्निक दर्शनसाठी उपस्थित राहिले होते. देवीच्या दर्शनानंतर फळदेसाई यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचीही त्यांनी भेट घेतली.

मोपा विमानतळावर अचानक टॅक्सी पार्किंग फी वाढवल्याने टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन छेडण्यात सुरुवात

मोपा विमानतळावर अचानक टॅक्सी पार्किंग फी वाढवल्याने टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन छेडण्यात सुरुवात केली त्याला गोवा फॉरवर्ड चे नेते तथा आमदार विजय सरदेसाई आरजीचे नेते मनोज परब मांंद्रे चे माजी सरपंच एडवोकेट अमित सावंत यांनी पाठिंबा दिला

"बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अर्धे तिकीट"

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केली की राज्य सरकार लवकरच कदंब परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या खाजगी क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अर्धे तिकीट भाडे योजना सुरू करेल. या उपक्रमाचा उद्देश काम करणाऱ्या महिलांना पाठिंबा देणे आणि परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आहे:मुख्यमंत्री प्रमोद सावं

"जॉब आहेत, ते स्वीकारण्याची तयारी ठेवा" मुख्यमंत्री

जॉब आहेत. ते स्वीकारण्याची तयारी ठेवा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे युवकांना आवाहन. डिचोलीत जॉब प्लेसमेंट मेळाव्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

रस्त्याच्या खराब स्थितीमुळे महाखाझान कोलवाळ येथे अपघात

महाखाझान कोलवाळ येथे अपघात झाला, रस्त्याच्या खराब स्थितीमुळे हिरो स्प्लेंडर बाईक घसरून खाली पडली. त्यांना वाचवण्यासाठी मागून येणाऱ्या गाड्या अचानक थांबल्या त्यामुळे इतर गाड्या एकमेकांच्या मागे धडकल्या. चार गाड्या खराब झाल्या आहेत, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोलवाळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पंचनामा सुरू आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

गोवा दूध संघ कर्मचारी संघटना गोमंतक मजदूर संघाने फोंडा येथे काढली शांततापूर्ण रॅली

गोवा दूध संघ कर्मचारी संघटना गोमंतक मजदूर संघाने फोंडा येथे शांततापूर्ण रॅली काढली. गोवा डेअरी बस कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणे आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधणे हा या रॅलीचा उद्देश होता

भारताने जिंकला आशिया कप, पाकिस्तानी मंत्र्यांकडून नाकारली ट्रॉफी

रविवारी मध्यरात्री, भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला, ज्यामुळे स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध त्यांचा सलग तिसरा विजय झाला. टीम इंडियाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्यांकडून स्पर्धेचा ट्रॉफी आणि विजेत्याचे पदके स्वीकारण्यास नकार दिला. पहिला सामना जिंकल्यानंतर भारताने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर हा दुसरा वाद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sovereign Gold Bond: जॅकपॉट लागला! सॉव्हरेन गोल्ड बाँडमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा; मिळणार 153 % परतावा

PM Modi Celebrates Diwali: "INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली", PM मोदींची दिवाळी गोव्यात; नौदलासोबत साजरा केला जल्लोष

Salman Khan: "बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' वेगळे! सलमान खानच्या 'त्या' विधानावर वाद, नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर VIDEO

"दिल्लीची माजी मुख्यमंत्री, तरीही भाड्याच्या घरात राहते", गोव्याच्या 'आप' प्रभारी आतिषी यांचा थक्क करणारा खुलासा; Watch Video

Cricketer Retirement: 'जम्मू-काश्मीर' ते 'टीम इंडिया': परवेझ रसूलच्या क्रिकेट प्रवासाला पूर्णविराम, सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली

SCROLL FOR NEXT