Dempo Club Dainik Gomantak
गोवा

Goa News: धेंम्पो स्पोर्ट्स क्लबने नोंदवला शानदार विजय, दिल्ली एफसीला दिली मात; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील राजकीय, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

Sameer Amunekar

I-League Football Tournament: धेंम्पो स्पोर्ट्स क्लबने नोंदवला शानदार विजय; दिल्ली एफसीला दिली मात

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत धेंम्पो स्पोर्ट्स क्लबने पाच सामन्यांनंतर शानदार विजय मिळवला. त्यांनी दिल्ली एफसीचा 1-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. 83व्या मिनिटाला बदली खेळाडू नेस्टर डायसने निर्णायक गोल केला.

 Rohan Khaunte:  शॅक व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी शॅक व्यावसायिकांची: मंत्री खंवटे यांचं प्रतिपादन

शॅक संघटनेला विश्वासात घेऊन धोरणाची निर्मिती. यावर्षी वेळेच्या आधी सर्वांना शॅक देण्यात आले. आता ही त्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी शॅक व्यवस्थित चालवावे. जे शॅक व्यावसायिक बेकायदेशीर धंदा करताहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

Goa Crime: पर्वरी पोलिसांकडून दुचारी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

पर्वरी पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या चोरट्यांकडून चार दुचाकी जप्त केल्या. या टोळीतील ललित वायंगणकर याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली. अल्पवयीन संशयिताचा मयडे येथील मंदिरातील चोरीमध्ये हात होता.

Goa Crime: अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्ररणी एकाला अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी तामिळनाडूचा आहे.

LIVE: श्री सातेरी देवस्थान किर्लपाल दाबळच्या सुशोभीकरणाला मंजुरी: मुख्यमंत्री सावंत

Bardez Water Supply: डब्ल्यूआरडी अभियंत्यांवर कडक कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री

सात दिवसांनंतर आज सकाळी आमठाणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. बार्देश तालुक्यात संध्याकाळपर्यंत पाणी सोडले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. दरवाजे उघडण्यास विलंब करणाऱ्या डब्ल्यूआरडी अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

Madgaon: मडगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मोकळ्या जागेत कचराफेक

पेडा खारेबांद येथे मोकळ्या जागेत कचरा टाकताना स्थानिकांनी मडगाव महानगरपालिकेचा ट्रक पकडला.

Mapusa Crime: म्हापशात विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद

दहावीच्या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका शिक्षिके विरुद्ध गुन्हा नोंद केला. विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्यासाठी आग्रह धरल्यामुळे मारहाण केली होती.

Mahakumbh 2025: महाकुंभमधल्या संगम घाटावर चेंगराचेंगरी

मौनी अमावस्येला दुसरं अमृत स्नान असल्याने यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते. यामुळे बुधवारी सकाळी संगम इथं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. चेंगराचेंगरीमध्ये काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात भाविक जखमी देखील झाले आहेत. 

Bardez Water Supply: बार्देशला पाच दिवसांनी उद्या पाणी मिळणार

बार्देशला पाच दिवसांनी उद्या पाणी मिळणार आहे. आमठाणे धरणाचा दरवाजा उघडण्यात जलसंपदा खात्याला यश आलंय. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात दुपारपर्यंत पुरेसे पाणी पोचणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT