Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हादई PARWAH बैठक 4 मार्च रोजी; जाणून घ्या गोव्यातील महत्वाच्या बातम्या

Goa Marathi Breaking News 13 February 2025: गोव्यातील ताज्या घडामोडी मराठीमध्ये जाणून घ्या

Akshata Chhatre

Mhadai Dispute: म्हादई PARWAH बैठक 4 मार्च रोजी

म्हादई प्रवाह नावाची बैठक ४ मार्च रोजी मुंबई येथे भरेल. यावेळी कळसा-नाळा आणि विर्डी धरणावर चर्चा केली जाईल.

Goa News: कर्नाटक खाण घोटाळ्यात गोव्यातील भाजपचे मंत्री गंभीर दोषी?

कर्नाटकातील सर्वात मोठ्या खाण घोटाळ्यात गोव्यातील भाजप सरकारमधील एका प्रमुख मंत्र्याला गंभीर शिक्षा भोगावी लागत आहे. 2015 पासून हे प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालय 24 फेब्रुवारी रोजी अंतिम आदेश देणार आहे. दोषी आढळल्यास मंत्र्यांना सात वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो : गिरीश चोडणकर

Goa Traffic: स्मार्ट सिटीच्या कामांमुळे भाटलेतील दररोजचे दृष्य!

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे भाटलेतील वाहनचालकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.

Sports News: रजत पाटीदार; 2025 साठी RCBचा कर्णधार

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने IPL 2025 च्या मोसमासाठी रजत पाटीदारला फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

Goa News: भाईडकरांची याचिका सुनावणीस घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार!

म्हापशातीर प्रसिद्ध देव बोडगेश्वर देवस्थानाच्या निवडणुकीत २५४ महाजनांना मतादानाचा अधिकार देण्याच्या बार्देश देवालये प्रशासकाच्या निर्णयाला देवस्थानाचे माजी अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्याने उच्च न्यायालयाचा सुनावणी घेण्यास नकार. प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला.

Goa Accident: होंडा पिसुर्ले रस्त्यावर अपघात

होंडा पिसुर्ले रस्त्यावर ट्रक व दुचाकी मध्ये अपघात, दोघे गंभीर जखमी, वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल.

Goa Crime: गोव्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण

अज्ञात व्यक्तीने १७ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार कुंक्कळी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली. पोलिसांनी गोवा बाल अधिनियमाच्या कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सुदन भोसले करीत आहेत.

Goa Crime: डॅनियली मॅकलॉग्लीन खून प्रकरण; निकाल उद्यावर

मडगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आयरिश बॅकपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन खून खटल्याचा निकाल उद्यासाठी ढकलला केला आहे.

Goa Politics: गोव्याच्या राज्यपालांनी घेतली राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तिरुअनंतपुरममधील अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित असताना केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची राजभवनात भेट घेतली.

Goa Agriculture: सुपारी,काजू,मिरीवरील आयत शुल्क वाढवा!

सुपारी,काजू आणि मिरी या उत्पादनावरील आयात शुल्क वाढवा. गोवा बागायतदार संस्थचे अध्यक्ष एड.नरेंद्र सावईकर व इतर संचालकांचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांना निवेदन सादर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT