Goa Marathi Academy Dainik Gomantak
गोवा

गोवा मराठी अकादमीतर्फे आज ‘अनवट शांताबाई’

अभिनव कार्यक्रम: मिनेझिस ब्रागांझा सभागृहात

दैनिक गोमन्तक

पणजी: मराठीतील ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, गोवा मराठी अकादमीने रविवार दि. 8 मे रोजी संध्याकाळी 4.00 वाजता पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ‘अनवट शांताबाई’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे संहिता संशोधन केले असून त्यांच्यासोबत पुण्याच्या अनुराधा जोशी, गौरी देशपांडे आणि दीपाली दातार या अभिवाचन करणार आहेत.

अनुप कुलथे हे या कार्यक्रमात व्हायोलीनची साथ करणार आहेत. शांताबाईंच्या रचनांची ‘अनवट शांताबाई’ ही मैफल म्हणजे रसिकांना वाङमयीन श्रीमंतीचे देणे देणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमातील प्रभावी निवेदनातून शांताबाई स्वत:च स्वत:च्या कवितेविषयी रसिकांशी सहजसुंदर संवाद करीत आहेत असा अनुभव येतो. ‘धूळपाटी’, ‘संस्मरण’, ‘जाणता अजाणता’ या त्यांच्या ललित लेखनातील उतारे कार्यक्रमाला नव्या उंचीवर घेऊन जातात. या कार्यक्रमात गोमंतकीय रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT