Goa Police |Goa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: सोनसाखळी चोर अखेर जेरबंद ; चोरटे वास्कोचे रहिवासी

Mapusa Police: कोलवाळ पोलिसांची कामगिरी : संशयितांना तीन दिवसांची कोठडी

दैनिक गोमन्तक

Mapusa Police: सोनसाखळी चोरीप्रकरणी लूक आऊट नोटीस जारी केलेल्या संशयितांच्या मुसक्या अखेर कोलवाळ पोलिसांनी वास्कोत आवळल्या.

शुक्रवारी दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून अश्पाक कादूर (25) व हुसैन रशीद (23) अशी या संशयितांची नावे आहेत. हे दोघेही चोरटे वास्कोचे रहिवासी आहेत. म्हापसा न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कोलवाळ पोलिसांच्या माहितीनुसार, गणेशनगर, अस्नोडा येथे एका महिलेची सोनसाखळी हिस्कावून नेल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोघा अज्ञात दुचाकीस्वार संशयित चोरांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती.

ही घटना गेल्या 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45च्या सुमारास घडली होती. फिर्यादी इवारिस्ता डिसोझा ही महिला अस्नोडा चर्चमधून घरी गणेशनगर येथे जात होती. ती वाड्यावर पोहचताच स्कूटरवरून आलेल्या दोघा चोरांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिस्कावत तेथून धूम ठोकली होती.

असा लागला छडा...

सीसीटीव्हीत या संशयितांची छबी बंदिस्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध छायाचित्रांसह लूकआऊट नोटीस जारी केली. या छायाचित्रांद्वारे वास्को पोलिस स्थानकाच्या एका पोलिस कॉन्स्टेबलने ओळख पटविली व याची माहिती कोलवाळ पोलिसांना दिली. त्यानंतर, कोलवाळ पोलिसांनी वास्को पोलिसांच्या सहाय्याने या चोरांना न्यू-वाडा येथे अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT