Mapusa Municipality | Garbage
Mapusa Municipality | Garbage Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापशात साफसफाई अभावी साचला कचऱ्याचा ढिगारा!

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: म्हापसा येथील नगरपालिका क्षेत्रातील काही ठिकाणी योग्यरीत्या कचरा उकल होत नसल्याने शहराला गलिच्छ रूप आले असून, दुर्गंधी पसरली आहे. शालिनी हॉटेलच्या मागील बाजूने टाकलेला कचरा मागील काही दिवस उचलला गेलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा तयार झाला आहे.

गेल्या 21 ऑक्टोबर रोजी पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्या दिवशी पालिका मंडळाने रोजंदारी कामगारांच्या साहाय्याने कचरा उकल केला होता. त्यानंतर सोमवारी 24 रोजी दिवाळी सण होता.

त्यामुळे, त्या दिवशी पालिकेला सुट्टी असल्यामुळे शहरातील कचरा उकल झाले नव्हते. त्यानंतरही दोन दिवस पालिका क्षेत्रातील योग्य प्रकारे कचरा उकल झाला नाही. शालिनी हॉटेलच्या मागच्या बाजूने टाकला जाणारा कचरा गेले कित्येक दिवस उचलला गेलेला नाही. त्यामुळे या जागी कचऱ्याचा ढीग पडून दुर्गंधी पसरली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT