Mapusa bus station  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापसा मार्केटमधील प्रश्न रेंगाळलेलाच!

Mapusa Municipality: पालिकेकडून दुकानदारांना थकित भाड्यासंबंधी नोटिसा

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: येथील पालिका मार्केटमधील एकूण 108 दुकानांना लागलेले ग्रहण अजून सुटलेले नाही. ‘जैसे थे’ या अटीवर सुपुर्द केलेल्या या दुकानांचे भाडे भरण्यास संबंधित दुकानदारांनी सध्या आक्षेप घेतला असून यावर येत्या आठवड्याभरात तोडगा काढण्याचे आश्वासन म्हापसा पालिकेने दिले.

म्हापसा नगरपालिकेने गोवा नागरी विकास एजन्सीतर्फे 2014 मध्ये, 1 कोटी 65 लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला. तर 2019 मध्ये लिलावदार भाडेकरूंच्या ‘जैसे थे स्थितीत’ ही 108 दुकाने हवाली करण्यात आली.

मात्र, वीजजोडणीसाठी या दुकानदारांना पालिकेने ताटकळत ठेवले. याशिवाय या दुकानांत व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय (ट्रेड) परवाना या भाडेकरूंना अजून दिलेला नाही.

तसेच वीजजोडणीसंदर्भात या प्रकल्पातील वीजवाहिन्या निष्कृष्ट दर्जाच्या असल्याचा ठपका ठेवत वीज खात्याने त्या देण्यास थेट नकार दिलेला. अखेर, म्हापसा पालिकेने वीजवाहिन्या बदलल्या व वर्षभरानंतर दुकानांना वीजजोडणी मिळाली.

नुकतीच पालिका मुख्याधिकाऱ्यांनी या दुकानदारांना थकित भाडे रक्कम जमा करण्याची नोटीस बजावलेली. या नोटिसीला दुकानदारांनी आक्षेप घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर या दुकान भाडेकरूंसोबत नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर व मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी बैठक घेतली.

आम्ही भाडे का भरावे?

दुकाने स्वाधीन केल्यानंतर कोणत्याही सुविधा किंवा परवाना आम्हाला दिल्या गेल्या नाहीत, अशा परिस्थितीत आम्ही दुकानांत व्यवसाय सुरू केलेला नाही. जर दुकानच सुरू केले नाही, तर भाडे कसे भरणार, असा पवित्रा बैठकीत या दुकानदारांनी घेतला. याविषयी पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा करून पालिका संचालनालयाच्या मान्यतेनुसार योग्य तो तोडगा काढू, अशी ग्वाही नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर तसेच मुख्याधिकाऱ्यांनी या दुकानदारांना दिली.

"सोमवारी म्हापसा बाजारपेठेमधील दुकान प्रकल्पातील भाडेकरू दुकानदारांसोबत बैठक झाली. या दुकानांसंदर्भातील प्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल."

- शुभांगी वायंगणकर, म्हापसा नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT