Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: दिव्‍यांग गणेश नाईकने दिला 'स्‍वावलंबी' धडा!

Goa News: दिव्‍यांग असूनसुद्धा तो आज कोणावरही अवलंबून नाही, हे विशेष.

दैनिक गोमन्तक

Goa News: ‘आत्मनिर्भर’ या शब्‍दाला जागणारा आणि तो शब्‍द प्रखर निष्ठेने सार्थकी लावणारा अन्साभाट-म्हापसा येथील 43 वर्षीय दिव्‍यांग युवक गणेश श्रीपाद नाईक याने आपले शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडून लॉटरी व नंतर कुलुप विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

दरम्यान, गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून तो सचोटीने म्हापसा पालिकेच्या प्रवेशद्वारावर आपला व्‍यवसाय करीत आहे. त्‍यामुळे त्‍याचा धंदा चांगला होतोच शिवाय या व्यवसायातून तो स्‍वावलंबी बनून आपला उदरनिर्वाहही चालवतो. दिव्‍यांग असूनसुद्धा तो आज कोणावरही अवलंबून नाही, हे विशेष.

गणेश नाईक हा पायांनी अपंग. त्‍यामुळे इतरांप्रमाणे धावपळ करणे त्‍याला शक्य होत नाही. मात्र कोणत्‍याही परिस्‍थितीत हार मानायची नाही अशी खूणगाठ त्‍याने मनाशी बांधली आणि 21 वर्षांपूर्वी त्‍याने लॉटरी व्‍यवसायाचा मार्ग निवडला.

प्रामाणिकपणा, सचोटी आणि आपुलकी या गुणांवर त्‍याने व्‍यवसायात आपला जम बसविला. त्यावेळी म्हापसा (Mapusa) पालिकेच्या प्रवेशद्वारावर लॉटरी व्यवसाय तेजीत चालत असे. लोकांशी त्याचा संवाद वाढल्‍यामुळे व्यवसाय करण्यास त्याला आणखी प्रोत्साहन मिळाले. विशेष म्‍हणजे त्याची आई त्याच्यामागे खंबीररपणे उभी राहिली.

जोडीला कुलुपे विकण्‍याचा धंदा

पूर्वीप्रमाणे आज लॉटरी व्यवसायाला तेजी राहिलेली नाही. त्यामुळे गणेशने लॉटरीविक्रीच्या जोडीला कुलुप विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आज पूर्णवेळ व्यवसाय करूनही प्रतिदिन 100 रुपये त्‍याला मिळतात.

देणाऱ्यांचे हात हजार....अन्साभाट ते पालिका बाजार हा प्रवास करण्यासाठी गणेश याला कै. यशंवत (बाबा) नाईक यांनी तीनचाकी सायकल दिली. तसेच सुरूवातीला कै. जयप्रकाश पोवळेकर यांचे गणेशला सहकार्य लाभले. त्याकाळी पोवळेकर हेसुद्धा म्हापसा पालिकेच्या प्रवेशद्वारावर लॉटरी विक्रीचा व्यवसाय करीत होते.

पत्रकार तथा माजी नगरसेवक गुरुनाथ नाईक यांनी त्याची ओळख पोवळेकर यांच्याशी करून दिली. त्यानंतर त्याला ईमायल विराणी व श्रीरंग नार्वेकर यांनी आर्थिक सहकार्य केले. पाच वर्षांपूर्वी म्हापसा रोटरी क्लबने त्‍याला नवीन तीनचाकी सायकल दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT