Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023: बाजारपेठ सजल्या, लगबग वाढली, म्हापसा बाजारात नवचैतन्याचे वातावरण

उलाढाल वाढणार : बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू; यंदा ‘चवथ’ फुलेल : विक्रेते

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2023: राज्यात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. गणेशोत्सव जवळ येताच, मूर्ती बनविणाऱ्या कारागिरापर्यंत मार्केटमधील व्यावसायिक महिन्याआधी दुकानांत माल भरण्यास सुरुवात करतात. कोविडनंतर, आता मार्केटवर कोणतेही निर्बंध नसल्याने आता बऱ्यापैकी लोक बाजारात खरेदी करण्यासाठी फिरताना दिसत आहेत.

एकूणच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. गणरायाच्या आगमनाने आर्थिक उलाढाल वाढण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे.

गणेशोत्सवासाठी अनेक व्यावसायिकांनी ७० ते ८० टक्के अतिरिक्त माल खरेदी करीत विक्रीला ठेवला आहे. यंदाची चवथ फुलेल, अशी आशा व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव काळात जास्त मागणी असते, ती कपड्यांना. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांत गणपतीसाठी लाखांचा माल भरला आहे. हळूहळू लोक खरेदीसाठी येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

येत्या बुधवारपासून लोकांची झुंबड उडेल असे त्यांचे मत. कपडे, बांगड्या, घरगुती साहित्य, संसारोपयोगी भांडी, खाद्यपदार्थ, विविध ड्रायफ्रूट्सनासुद्धा मागणी आहे. अद्याप माटोळी बाजार भरला नसून येत्या तीन दिवसांत हा बाजार भरेल.

म्हापसा बाजारपेठमधील कपडे तसेच बांगड्यांच्या दुकानांत महिला वर्गाची गर्दी दिसत आहे. फॅन्सी बांगड्या, मेटल बांगड्या, काचेच्या बांगड्यासाठी वर्दळ दिसते. तसेच पीन, काटा, साडी पीनआदी प्रकारचे साहित्य विकणाऱ्या स्टॉल्समध्ये सुद्धा खरेदी दिसत आहे.

येथील बाजारपेठेत रस्त्याच्या मध्यभागी कपडे विक्रेते बसतात. त्यांनीही गणपतीसाठी अतिरिक्त माल भरला असून, मुंबई, सांगली तसेच कोल्हापूरमधून हा माल मागविण्यात आला आहे.

या विक्रेत्यांकडे लहान मुलांपासून मोठ्या पुरुषांपर्यंत बूट, सँडेल, टी शटर्स, शटर्स, अंडर गारर्मेंट, बेल्ट, गॉगल्स, धूप, अगरबत्ती आदी वस्तू मिळतात.

गणपतीसाठी अतिरिक्त माल भरला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक चांगला व्यवसाय होईल, अशी आशा आहे, असे कपडे विक्रेता भारत तोरस्कर यांनी सांगितलेे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT