Indian Women’s League (IWL) 2 in Goa Dainik Gomantk
गोवा

IWL-2: महिला खेळाडू विनयभंग प्रकरणाला कलटणी? टीममधील अन्य महिला खेळाडू शर्मांच्या पाठीशी; म्हणाल्या 'असा प्रकार घडलाच नाही, उलट..

Indian Women’s League (IWL) 2 in Goa: ''प्रत्येक वेळी मुलं चुकीची नसतात, बऱ्याच वेळा मुलीही चुकीच्या असतात''- महिला खेळाडूंनी व्यक्त केल्या भावना

Ganeshprasad Gogate

Indian Women’s League (IWL) 2 in Goa: दोघा महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (एआयएफएफ) कार्यकारी समिती सदस्य हिमाचल प्रदेशमधील दीपक शर्मा याच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेनंतर गोव्यासह देशभरातील क्रीडा क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल क्लबच्या 21 वर्षीय महिला खेळाडूने तक्रार नोंदवली आहे. त्या महिला खेळाडूच्या म्हणण्यानुसार दीपक शर्मा दारूच्या नशेत फिर्यादीच्या खोलीत घुसला आणि तिला मारहाण केली.

पुन्हा थोड्या वेळाने संशयित महिला खेळाडूंच्या रुममध्ये घुसला आणि दुसऱ्या एका 18 वर्षीय खेळाडूच्या कानशिलात मारली. मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी फिर्यादीने म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दिली असता, पोलिसांनी शर्माविरुद्ध भादंसंच्या कलम 451, 323, 354 (अ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

मात्र या अटक प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या फुटबॉल क्लबमधील अन्य महिला खेळाडूंनी मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार सदर तक्ररदार महिला खेळाडू रात्री 11.30 च्या दरम्याने टीम मधील कुठल्याही सहकाऱ्याला आणि महासंघाचे कार्यकारी समिती सदस्य दीपक शर्मा यांना न सांगता एकटीच मार्केटमध्ये गेली होती.

ती रूमवर परतल्यावर दीपक शर्मा यांनी तिला त्याच्या या कृत्याबद्दल जाब विचारला. ''अनोळखी शहरात असं न सांगताच जाणं योग्य आहे का? तुमची जबाबदारी माझ्यावर आहे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही'', अशा शब्दात शर्मा यांनी सदर खेळाडूची कान उघाडणी केली.

याचाच राग मनात ठेऊन तिने दीपक शर्मा यांच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केल्याची माहिती टीम मधील अन्य महिला खेळाडूंनी दिली आहे.

तसेच प्रत्येकवेळी मुलं चुकीची नसतात, बऱ्याचवेळा मुलीही चुकीच्या असतात अशा भावना त्या टीममधल्या महिला खेळाडूंनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे या प्रकारणांला वेगळी कलाटणी मिळणार असून या घटनेतील सत्य पोलीस तपासावेळी उघड होईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assault Case: काणकोणात ज्येष्ठ नागरिकांना मारहाण, उप-जिल्हाधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या घेऱ्यात; कुटुंबाने केले गंभीर आरोप

Bus Accident: भीषण अपघात! बस दरीत कोसळून 42 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Parra Road: 'हे झाड कधीही कोसळेल!' 2.5 वर्षांपासून दुर्लक्ष; साळगाव सरपंचांचा वन विभागाला 'अल्टिमेटम'

Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

KBC Viral Video: "मला नियम सांगू नका", करोडपतीच्या सेटवर बिग-बींना उलटउत्तर; 10 वर्षांच्या स्पर्धकावर नेटकऱ्यांची टीका

SCROLL FOR NEXT